• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नवाब मलिक यांच्या मुलीने समीर वानखेडेंची केली पोलखोल, दिला मोठा पुरावा

नवाब मलिक यांच्या मुलीने समीर वानखेडेंची केली पोलखोल, दिला मोठा पुरावा

या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद म्हणून लिहिलेले आहे. याआधीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचे पहिले फोटो प्रसिद्ध केले होते.

या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद म्हणून लिहिलेले आहे. याआधीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचे पहिले फोटो प्रसिद्ध केले होते.

या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद म्हणून लिहिलेले आहे. याआधीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचे पहिले फोटो प्रसिद्ध केले होते.

 • Share this:
  मुंबई, 20 नोव्हेंबर : मुंबई क्रुज ड्रग्स पार्टी प्रकरणावरून (mumbai drug case) राष्ट्रवादीचे (ncp) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर एकापाठोपाठ एक आरोप केले. त्यानंतर आता मलिक यांच्या मुलगी निलोफर मलिक खान (Nilofer Malik Khan) यांनीही समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत मोठा पुरावाच सादर केला आहे. नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी एक ट्वीट करून धुरळा उडवून दिला आहे. निलोफर यांनी समीर वानखेडे यांच्या निकाहाची पत्रिकाच समोर आणली आहे. 2006 मध्ये समीर वानखेडे यांचं  डॉ शबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला होता. त्याच निकाहाची पत्रिका निलोफर यांनी समोर आणली आहे. या पत्रिकेत समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव हे दाऊद म्हणून लिहिलेले आहे. याआधीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाचे पहिले फोटो प्रसिद्ध केले होते. त्यावरूनही मोठा वाद निर्माण झाला होता. वानखेडे कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण, मलिक यांनी एकापाठोपाठ पुरावे देत समीर वानखेडे हे मुस्लिमच होते, असा दावा केला आहे. याच मुद्यावरून समीर वानखेडे यांचं जात प्रमाणपत्र खरं आहे की खोटं आहे, याची तपासणी जात पडताळणी आयोगाकडे सुरू आहे. नबाव मलिक यांनी केली वानखेडेंच्या राजीनाम्याची मागणी आज हायकोर्टाने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या निकालानंतर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याच्या फर्जीवाडयावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'हायकोर्टाच्या निकालानंतर आर्यन खान आणि इतर जणांकडून कोणतेही ड्रग्स मिळाले नाही. मी सुरुवातीपासूनच हे सांगत होतो. आर्यन खानचे अपहरण करूण खंडणीसाठी प्लॅन रचण्यात आला होता. आता हे या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असं मलिक म्हणाले. NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर इथे जागा रिक्त: इतका मिळणार पगार आता समीर दाऊद वानखेडे सुप्रीम कोर्टात धाव घेईल. रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टाने जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती. हा सगळा जनतेचा पैसा आहे अशी उधळपट्टी थांबली पाहिजे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. 'समीर वानखेडे हा खोट्या केसेस करुन लोकांना अडकवत आहे. खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे. आता वेळ आली आहे, केंद्र सरकारने भूमिका घेऊन या भ्रष्ट अधिकार्‍याचे तात्काळ निलंबन करावे आणि आताही पाठराखण झाली तर भाजपचा यामागे हात आहे हे स्पष्ट होईल, असा टोलाही नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. आर्यन खान प्रकरणात कोर्टाने काय केलं नमूद? हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता. जामीन मंजूर करत असताना  आर्यन खानच्या जामिनावर निकाल देताना मुंबई  हायकोर्टाने नोंदवले महत्वपुर्ण निरीक्षण आता समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एनडब्ल्यू सांबरे यांनी ही निरीक्षण नोंदवली आहे. तळीरामांसाठी गोड बातमी, 'या' दारूच्या उत्पादन शुल्कात तब्बल 50 टक्के कपात! आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शिअल क्वांटिटीमध्ये अंमली पदार्थ सापडलेत असं प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे हे या टप्प्यावर सांगणे कठीण आहे, असं कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे. तसंच, त्यांनी गुन्हेगारी षडयंत्र रचले आहे असे अनुमान काढण्यासाठी कोणतेही आधारभूत कारण सध्या तरी दिसत नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. एनसीबीने आर्यन खानच्या फोनमधून घेतलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा दाखल देत तो कटात सहभागी असल्याचा दावा केला होता. पण, या चॅटमध्ये आर्यन आणि अरबाज मर्चंट किंवा तिघांनीही इतर आरोपींसोबत एनसीबीने आरोप केल्यानुसार कोणताही कट रचला हे असे आक्षेपार्ह काहीही प्रथमदर्शनी तरी दिसत नाही, असंही निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवलं आहे.
  Published by:sachin Salve
  First published: