मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नवाब मलिक उद्या कोणता बॉम्ब फोडणार? उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेची नवी वेळ

नवाब मलिक उद्या कोणता बॉम्ब फोडणार? उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेची नवी वेळ

समीर वानखेडेंवर सातत्याने तोफ डागत असलेल्या नवाब मलिकांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेत तोफेच्या तोंडी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे.

मुंबई, 6 नोव्हेंबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Cruise drug party case) आरोप-प्रत्यारोपांची मालिका थांबयचं नाव घेत नाहीय. भाजपचे नेते मोहित कंबोज (BJP Mohit Kamboj) यांनी पत्रकार परिषद घेत ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन राष्ट्रवादीवर गंभीर आरोप केले होते. या सर्व प्रकरणात सुनील पाटील (Sunil Patil) नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप मोहित कंबोज यांनी केला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी ट्वीट करत मोहित कंबोज यांना प्रत्यु्त्तर दिलं होतं. या संदर्भात नवाब मलिक उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना या प्रकरणाच्या चौकशीतून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे समीर वानखेडेंवर सातत्याने तोफ डागत असलेल्या नवाब मलिकांच्या उद्याच्या पत्रकार परिषदेत तोफेच्या तोंडी कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष्य आहे.

सकाळी नवाब मलिक यांनी ट्वीट करत म्हटलं होतं की, "समीर दाऊद वानखेडेंच्या खाजगी सैन्याच्या सदस्याने चुकीची दिशाभूल करण्यासाठी आणि सत्यापासून लक्ष वळवण्यासाठी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उद्या मी सत्य समोर आणणार."

आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवलं, नवाब मलिक म्हणाले...

मोहित कंबोज यांनी काय आरोप केले होते? 

मोहित कंबोज म्हणाले की, गेल्या महिन्यापासून एक प्रकरण गाजत आहे. ते म्हणजे आर्यन खान प्रकरण… दोन तारखेला अटक झाली आणि 3 तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर 6 तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनिल पाटील आहे. हा सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे असा दावाही मोहित भारतीय यांनी केला आहे.

20 वर्षांपासून सुनील पाटील एनसीपीच्या संपर्कात

सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे आणि तो गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहे. सुनील पाटील हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याचा जिगरी मित्र आहे. सुनील पाटील हा बदल्यांचं रॅकेट चालवत होता. सुनील पाटील याचे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध असल्याचाही गंभीर आरोप मोहित भारतीय यांनी केला आहे.

आर्यन खान प्रकरण काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस

मोहित भारतीय यांनी पुढे म्हटलं, किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस आहे. सुनील पाटील यांनी किरण गोसावींचा नंबर सॅम डिसूझाला दिला होता. इथे हा प्रश्न निर्माण होत आहे की एनसीपीने सुनील पाटीलला पुढे करत हे का केले, कोण मंत्री आहे जे हे सगळे करत आहेत. खूप सिनियर लिडर आहे, मी त्यांच्यावर आरोप लावत नाही पण त्यांना हे सांगावे लागले की, त्यांच्या लोकांचे, मंत्र्यांचे पक्षाचे या व्यक्तींशी काय संबंध आहे

First published:

Tags: Aryan khan, Nawab malik