Home /News /mumbai /

BREAKING : नवाब मलिक यांना अखेर खासगी हॉस्पिटलमध्ये हलवलं

BREAKING : नवाब मलिक यांना अखेर खासगी हॉस्पिटलमध्ये हलवलं

 मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे,

मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे,

मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे,

    मुंबई, 17 मे :  मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या दीड महिन्यांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नवाब मलिक यांना अखेरीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर किडनी आणि इतर आजारांवर उपचार होणार आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॅांड्रिंग प्रकरणी इडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना आत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ईडी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी अंशातः दिलासा दिला होता. त्यांना असलेल्या आजारावर ते खाजगी रुग्णालयात उपाचार करु शकतात अशी परवानगी काही दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ईडी न्यायालयाने दिली होती. (सायकल चालवताना लागला आईला धक्का, अभिनेत्रीने 9 वर्षाच्या मुलावर केला गुन्हा दाखल) त्यानंतर आज कुर्ला येथील क्रिटीकेअर हॅास्पिटलमध्ये नवाब मलिक यांना  दाखल करण्यात आले आहे. मलिक यांना किडनी आणि इतर व्याधींचा त्रास होत आहे, आता त्यांच्यावर खासगी रुग्णालयात पुढील उपचार होणार आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे. दरम्यान, मलिक यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होणार असून यावेळेस मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. हॉस्पिटल बाहेर ठेवण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताचा खर्च हा मात्र नवाब मलिक यांना करावा लागणार आहे, असे निर्देश कोर्टाने दिले आहे. (मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेला, अन् परतलाच नाही; सतीश चौधरीचा भयावह अंत) याआधी 02 मे रोजी नवाब मलिक यांना आर्थर रोड कारागृहातून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे तब्येतीमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे त्यांना तातडीने कारागृहातून स्ट्रेचरवर घेऊन जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  स्टेज II च्या क्रॉनिक किडनी रोगामुळे त्याला पाय दुखणे आणि सूज येण्याची तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर त्यांना आता खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या