Home /News /mumbai /

नवाब मलिक Vs समीर वानखेडे! 'त्या' फोटोमुळे मोठी चर्चा, अखेर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

नवाब मलिक Vs समीर वानखेडे! 'त्या' फोटोमुळे मोठी चर्चा, अखेर वानखेडेंनी दिलं स्पष्टीकरण

अखेर या प्रकरणात समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

    मुंबई, 21 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका (Nawab Malik tweets photos of Sameer Wankhede in Dubai) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेचे दुबईतील हॉटेलमधील फोटो ट्विट केले आहेत. आपण दुबईला गेलोच (Sameer wankhede denied the allegations) नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. यानंतर आता NCB अधिकारी समीर वानखेडे याने पत्रकार परिषद घेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून माझ्या मृत आईवर, रिटायर्ड वडिलांवर आणि बहिणीवर नजर ठेवली जात आहे. माझ्या कुटुंबावर घाण शब्द आणि वैयक्तिक आरोप केले जात असून त्याचे मी खंडण करतो. यापुढे ते म्हणाले की, मी माझं काम करतोय, देशाची सेवा आणि ड्रग्सवर कारवाई करतोय यासाठी मला तुरुंगात टाकणार असाल तर मी तयार आहे. (Nawab Malik Vs Sameer Wankhede Big discussion due to that photo finally Wankhede gave an explanation) नवाब मलिक यांनी पोस्ट केलेले फोटो मुंबईतील आहेत आणि मी मुंबईत होतो. हवं तर माझा पासपोर्ट डेटा चेक करा. दुबईचे आरोप चुकीचे असून मी दुबईला कधीच गेलो नाही. मी मालदीवला गेलो होतो, तेदेखील डिपार्टमेंटची अधिकृत परवानगी घेऊन. मी माझ्या कुटुंबासोबत लहान मुलांसोबत मालदीव गेलो होतो. त्यामुळे खंडणीचे आरोप चुकीचे आहेत. हे ही वाचा-समीर वानखडेचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले Tweet, आरोपांची मालिका सुरूच मालदीवमध्ये मी कुठल्याही सेलिब्रिटीला भेटलो नाही. माझ्या तपासवर प्रश्न उपस्थित केला जातोय. परंतू माझी मृत आई, निवृत्त वडिल आणि बहिण याच्याबाबत बोलणं चुकीचं आहे. मात्र या आरोपांमुळे माझं खच्चीकरण होणार नाही.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या