Home /News /mumbai /

समीर वानखडेचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले Tweet, आरोपांची मालिका सुरूच

समीर वानखडेचे दुबईतील फोटो नवाब मलिकांनी केले Tweet, आरोपांची मालिका सुरूच

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका (Nawab Malik tweets photos of Sameer Wankhede in Dubai) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेचे दुबईतील हॉटेलमधील फोटो ट्विट केले आहेत.

    मुंबई, 20 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिका (Nawab Malik tweets photos of Sameer Wankhede in Dubai) आणि एनसीबी अधिकारी समीर वानखडेचे दुबईतील हॉटेलमधील फोटो ट्विट केले आहेत. आपण दुबईला गेलोच (Sameer wankhede denied the allegations) नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता. हा दावा खोटा असल्याचं सांगत नवाब मलिक यांनी समीर वानखडे दुबईतील हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विट केले आहेत. नवाब मलिक विरुद्ध समीर वानखडे या वादाची (Malik Vs Wankhede) मालिका अजूनही सुरूच असल्याचं या निमित्तानं पुन्हा एकदा दिसून आलं आहे. मलिक विरुद्ध वानखडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एका व्हॉट्सअप मेसेजच्या आधारे समीर वानखडेनं बोगस कारवाई केल्याचा आरोप नवाब मलिक गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. एका दौऱ्याच्या वेळी वानखडे दुबईला गेल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. हा आरोप फेटाळून लावत आपण दुबईला गेलोच नसल्याचं वानखडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. काय आहे प्रकरण? समीर वानखडे या दुबईत जाऊन बॉलिवूड स्टार्सकडून पैसे वसूल करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. वानखडे हा भ्रष्ट अधिकारी असून आपले काळे धंदे तो दुबईतून चालवत असल्याचं त्यानं म्हटलं होतं. हे आरोप धादांत खोटे असल्याचं सांगत आपण कधी दुबईला गेलोच नव्हतो, असा दावा समीर वानखडेनं केला होता. त्यानंतर आता 10 डिसेंबर 2020 या दिवशी समीर वानखडे दुबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये बसल्याचे काही फोटो ट्विटरवर अपलोड करत नवाब मलिक यांनी पुरावे देत असल्याचा दावा केला आहे. हे वाचा- तुमचा कंप्यूटर स्लो झालाय? या सोप्या पद्धतीने असा होईल सुपरफास्ट आरोपांची मालिका सुरूच क्रूझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर निशाणा साधला आहे. यापूर्वीदेखील त्यांनी समीर वानखडेवर आरोप केले होते. सुशांत सिंग केसमध्ये रिया चक्रवर्तीवर आणि इतर बॉलिवूड कलाकारांवर खोट्या केस दाखल केल्याचा आरोप त्यांनी वानखडेवर केला होता. तर त्यापूर्वी भाजप आणि एनसीबी एकमेकांच्या साथीनं मुंबईत आतंकवाद पसरवत असल्याचा आरोप त्यांनी बुधवारी केला होता.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Dubai, NCB, NCP

    पुढील बातम्या