मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'कबूल है...'! नवाब मलिकांचं मध्यरात्री नवं ट्विट; त्या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ?

'कबूल है...'! नवाब मलिकांचं मध्यरात्री नवं ट्विट; त्या फोटोमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ?

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वानखेडे मुस्लीम वेशात दिसत आहेत.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई, 22 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानची (Aryan Khan) जामिनीवर सुटका झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा हल्लाबोल सुरूच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे मुस्लीम असल्याचा दावा केला आहे. हे सिद्ध करण्यासाठी अनेकदा मलिकांनी नवनवे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्नही केला आहे. मात्र, समीर वानखेडे यांनी मलिकांचा हा दावा आतापर्यंत नेहमीच नाकारला आहे. अशात आता मध्यरात्रीच नवाब मलिकांनी आणखी एक ट्विट (New Tweet of Nawab Malik) करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटरवरून समीर वानखेडे यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वानखेडे मुस्लीम वेशात दिसत आहेत. हा फोटो ट्विट करत त्याला दिलेल्या कॅप्शनमध्ये नवाब मलिक म्हणाले, कबूल है, कबूल है, कबूल है...यह क्या किया तुने समीर दाऊद वानखेडे? मलिक यांनी जो फोटो ट्विट केला आहे त्या फोटोत वानखेडे लग्नातील खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. तर त्यांच्या शेजारीच बसलेले एक गृहस्थ त्यांची काही कागदपत्रांवर सही घेताना दिसत आहेत. हे दोघंही मुस्लीम पोशाखात दिसत आहेत. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे.

याआधीही नवाब मलिक यांनी निरनिराळे पुरावे सादर करत वानखेडे मुस्लीम असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी वानखेडे यांच्या शाळेतील दाखलेही समोर आणले होते. यातील काही ठिकाणी त्यांचं नाव समीर ज्ञानदेव वानखेडे तर काही दाखल्यांवर समीर दाऊद वानखेडे असं होतं. काही ठिकाणी धर्म हिंदू तर काही ठिकाणी मुस्लीम लिहिला गेला होता. यानंतर मलिकांनी आता हा नवा फोटो ट्विट करत पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

First published:

Tags: Nawab malik, NCB