मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"The Lalit मे छुपे है कई राज..." म्हणत नवाब मलिकांचं सूचक Tweet, रविवारी करणार नवा गौप्यस्फोट

"The Lalit मे छुपे है कई राज..." म्हणत नवाब मलिकांचं सूचक Tweet, रविवारी करणार नवा गौप्यस्फोट

Nawab Malik: गेल्या अनेक दिवसांपासून एनसीबी, समीर वानखेडे आणि विरोधी पक्षावर निशाणा साधणाऱ्या नवाब मलिक यांनी आता ट्विट करुन सूचक इशारा दिला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 3 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) हे गेल्या काही दिवसांपासून पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यासोबतच भाजपवरही (BJP) निशाणा साधत आहेत. याच दरम्यान आता नवाब मलिक यांनी दोन सूचक ट्वीट केले आहेत. तसेच रविवारी भेटूयात असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नवाब मलिक कोणता नवा गौप्यस्फोट करणार आणि आता मलिकांचा निशाणा कोणावर असणार यावरुन विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

नवाब मलिक यांनी ट्विट करत म्हटलं, "शुभ दीपावली, आप सभी की दिवाळी मंगलमय हो.... होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज... मिलते है रविवार को" नवाब मलिक यांनी केलेल्या या सूचक ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आले आहे. तसेच नवाब मलिक आता कोणता नवा गौप्यस्फोट करतात हे पहावं लागेल.

यापूर्वी नवाब मलिकांनी सकाळी एक ट्विट करत म्हटलं होतं, "बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी. लोग बवजह उदासी का सबब पुछेंगे". नवाब मलिक हे सातत्याने ट्विट करुन किंवा पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून नवनवे गौप्यस्फोट आणि आरोप करत आहेत. त्यामुळे आता नवाब मलिक यांच्या निशाण्यावर कोण आहे आणि काय नवा गौप्यस्फोट करतात हे येत्या रविवारीच स्पष्ट होईल.

दिवाळीनंतर फटाके फुटणार - फडणवीस

1 ऑक्टोबर रोजी नवाब मलिक यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्त्युत्तर दिलं होतं. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात असं फडणवीस म्हणाले होते. तसेच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता.

"फटाक्यांचा आवाज येऊ द्या, नुसता धूर काढू नका"

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मगाशी गाडूतून येताना अजितदादा सांगत होते पुण्यानंतर बारामती दुसरं केंद्र बनेल शिक्षणाचं.... राजकारणाचं तर आहेच. बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी इते शिकवल्या जातात. आपण मिळून धडा शिकवण्याचं काम करू. चांगल्या कामाच्या आड येणार नाही. जे जे चांगलं काम आहे ते आपण करणारच आहोत.

दिवाळी सुरू झालीच आहे. काहीजण म्हणत आहेत फटाके फुटणार आहेत, बॉम्ब फुटणार आहेत. ठीक आहे आवाज येऊ द्यात पण धूर काढू नका. धूर काढू नका एवढ्यासाठी कारण कोरोना अद्याप गेलेला नाहीये असं म्हणत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

First published:

Tags: Drug case, Mumbai, Nawab malik, NCB