मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Mumbai Cruise drug party) प्रकरणात अटकेत आर्यन खानचा (Aryan Khan) जामीन अर्ज पुन्हा एकदा न्यायालयाने फेटाळला आहे. आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांची प्रतिक्रिया आली आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.
नवाब मलिकांनी म्हटलं, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यावर माझा कुठलाही आक्षेप नाहीये. ज्या पद्धतीने युक्तीवाद करण्यात आला... किला कोर्टापासून एनडीपीएस विशेष कोर्टापर्यंत युक्तीवाद वारंवार बदलत आले आहेत. नवनवीन विषय आणले जात आहेत. काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांना जामीन होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पब्लिसिटीसाठी लोकांना अडकवण्याचं काम करण्याचं काम सुरू आहे.
मागच्या वर्षभरातील एनसीबीच्या 90 टक्के केस या फेक आहेत. राजकीय हेतूने प्रेरित आहे. पैसे उकळण्याचं काम एनसीबी करत आहे. खंडणीचा रूपाने, दाबावाच्या रूपाने पैसे उकळण्याचं काम सुरू आहे असा गंभीर आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
वाचा : शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात अर्धातास बैठक, काय झाली चर्चा?
रेव्ह पार्टी जेव्हा जेव्हा झाली तेव्हा जी लोक सापडली त्यांचं युरिन आणि रक्ताचे नमुने घेऊन त्यांना पाठवण्यात आला आणि रिपोर्ट पोसिटीव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला. पण एनसीबी मात्र कोणतेही रक्ताचे आणि युरिनचे नमुने घेतले नाहीत. भाजप, एनसीबी आणि काही लोक मिळून दहशत पसरवत आहेत. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम करत आहेत. याचा भांडाफोड मी पुढील आठवड्यात करणार आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करतो की झोनल एनसीबी ऑफिसची चौकशी करावी असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
आर्यन खानला मोठा झटका, पुन्हा जामीन फेटाळल्याने तुरुंगातील मुक्काम वाढला
आर्यन खानला मोठा झटका बसला आहे कारण पुन्हा एकदा त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. जामीन फेटाळल्यामुळे आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. आर्यन खान याच्यासोबत अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या दोघांचाही जामीन फेटाळला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने आता आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले की, आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
यापूर्वीही म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी सुद्धा आर्यन खान याचा जामीन आर्ज न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या जामीन अर्जावर सुनावणी नंतर न्यायालयाने पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला आहे.
आर्यन खान अटकेचा घटनाक्रम
2 ऑक्टोबरला क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक
3 ऑक्टोबर रोजी एनसीबी कोठडीत रवानगी करण्यात आली
4 ऑक्टोबर - पुन्हा 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत ठेवण्याचा निर्णय आला.
7 ऑक्टोबर - पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
10 ऑक्टोबर - नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले
14 ऑक्टोबर - न्यायालयाने निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला
20 ऑक्टोबर - न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Drug case, Mumbai, Nawab malik, NCB