मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Covid Vaccine: "सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवणार नाही पण आम्हाला स्वतंत्र अ‍ॅपची परवानगी द्या"

Covid Vaccine: "सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवणार नाही पण आम्हाला स्वतंत्र अ‍ॅपची परवानगी द्या"

Nawab Malik on Cowin app: कोविड लसीसरण सुरळीत व्हाव यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची परवागी देण्याची मागणी राज्य सरकारकडून होत आहे.

मुंबई, 13 मे: राज्यात कोरोना लसींचा (Covid vaccine) तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. त्यातच कोविन अ‍ॅपवर (CoWIN App) सुद्धा नोंदणी करताना नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या सर्वांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यासाठी लसीकरणासाठी स्वतंत्र अ‍ॅप (separate app for vaccine registration) तयार करण्याची परवानगी देण्याची मागणी राज्य सरकार (Maharashtra Government) कडून करण्यात येत आहे.

पंतप्रधानांचा फोटो हटवणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटलं की, केंद्र सरकारला वाटत असेल की आम्ही सर्टिफिकेटवरील पंतप्रधानांचा फोटो हटवू पण आम्ही तसं करणार नाही हे आश्वासन देतो. सर्टिफिकेटवरील फोटो तसाच राहील पण आम्हाला स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची तसेच नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी द्यावी अशी मागणी करतो.

कोविन अ‍ॅपवर रजिस्टर करून लस दिली जात आहे. पण हे अ‍ॅप वारंवार डाऊन होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नागरिकांना नोंदणी करण्यासाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला हे अ‍ॅप तयार करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करत असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

...तर लसीकरण सुरळीत होईल

नवाब मलिक म्हणाले, केंद्र सरकारने स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्याची परवानगी दिली तर या अ‍ॅप आणि इतर माध्यमातून नागरिकांच्या नोंदणी होतील आणि त्यासोबतच लसीकरणही सुरळीत होईल. मात्र, राज्य सरकारला केंद्र सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाहीये.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Nawab malik