मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Nawab Malik: 'हिवाळी अधिवेशनात मोठ-मोठी नावे समोर येणार' नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य

Nawab Malik: 'हिवाळी अधिवेशनात मोठ-मोठी नावे समोर येणार' नवाब मलिकांचं सूचक वक्तव्य

Nawab Malik PC : नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाई प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 29 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि एनसीबीच्या (NCB) कारवाईवर प्रश्न उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच नवाब मलिक यांनी येत्या हिवाळी अधिवेशनात (Maharashtra winter session) गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच अधिवेशनात अनेक मोठ्या नावे समोर येतील असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनात मोठ-मोठी नावे समोर येणार

विधानसभा अधिवेशन वादळी ठरणार आहे. आत्ता बोलल्यावर ते कोर्टात जातील. विधानसभेत माझ्यावर जे काही आरोप होणार त्याचे उत्तर देताना जे काही मी समोर आणणार आहे. त्यामुळे या राज्यात त्यांना तोंड दाखवणं अवघड होणार आहे. अनेकांचा ड्रग्ज प्रकरणाची संबंध आहे. नेत्यांचे नाव आज मी घेत नाही. हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझे नाव घेऊन माझ्यावर हल्ले होणार आहेत. हिवाळी अधिवेशनात मोठी-मोठी नावे समोर येणार असं सूचक वक्तव्यही नवाब मलिकांनी केलं आहे.

वाचा : क्रांती रेडकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, नवाब मलिक म्हणाले 'मी रेडकर ताईंना सागू इच्छितो की... '

क्रांती रेडकर यांच्या पत्रानंतर मलिकांची प्रतिक्रिया

क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत म्हटलं, 'आम्ही मराठी आहोत आणि मराठी असल्याने आम्हाला मदत करा.' नवाब मलिकांचा परिवार ही 70 वर्षांपासून महाराष्ट्रात आहे. नवाब मलिक याच राज्याचा एक नागरिक आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचा नाहीये का? नवाब मलिक मराठी नाही का? मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र लिहिलं आहे पण मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे की कोणाला भेटायचं आणि कोणाला नाही. पण महाराष्ट्रातील कोणी म्हणत असेल की मी गुन्हा केलाय पण मी महाराष्ट्राचा असल्याने आम्हाला माफ करा तर आम्हाला वाटतं न्यायासमोर जात, धर्म, प्रांत काहीही नसतं. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, पण ज्यापद्धतीने पूर्ण भाजप यांच्यापाठी उभी राहिली आहे. सोमय्यांसोबत त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. जी माझी शंका होती की जो भूत आहे त्याचे प्राण याच पोपटात आहेत आणि पोपट आता पिंजऱ्यात बंद होणार आहे त्यामुळे पूर्ण राक्षसी विचाराचे लोक घाबरू लागलेत. जर पोपट पिंजऱ्यात अडकला तर पूर्ण राज खुले होतील का?

समीर वानखेडे यांच्यामागे भाजपचे नेते उभे राहिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला बदनाम करण्याचं षडयंत्र वानखेडेंच्या माध्यमातून केला जात आहे हे मी आधीपासूनच सांगत आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न वानखेडेंकडून होत आहे, महाराष्ट्राला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे असा आरोपही नवाब मलिकांनी केला आहे.

आर्यनला पकडून एनसीबी कार्यालयात नेणाराच आता गजाआड

जो व्यक्ती आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जात होता आज तोच गजाआड आहे. जो व्यक्ती आर्यन खानला जामीन न मिळावा यासाठी धडपडत होता तोच आता न्यायालयात धाव घेत आहे. आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. एनसीबी कारवाई नंतरचं चित्र आता बदललं आहे, पकडणारे वाचण्याचा रस्ता शोधत आहेत, म्हणून मी काल लिहिलेलं पिक्चर अभी बाकी है. काल तिघांना जामीन मिळाला, गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत जेलमध्ये ठेवणं हा अन्याय असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Drug case, Mumbai, Nawab malik, NCB