• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • Nawab Malik vs Sameer Wankhede: तुमची मेहुणी सुद्धा....?, नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना नवा सवाल

Nawab Malik vs Sameer Wankhede: तुमची मेहुणी सुद्धा....?, नवाब मलिकांचा समीर वानखेडेंना नवा सवाल

समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader Nawab Malik) नवाब मलिक हे एकामागोमाग एक आरोप करताना दिसत आहे.

 • Share this:
  मुंबई, 08 नोव्हेंबर: Samir Wankhede vs Nawab Malik: क्रूझ ड्रग्ज प्रकरणी (cruise drug case) देशाची राजधानी दिल्लीपासून मुंबईपर्यंत हालचाली वेगाने सुरू आहेत. याच दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) म्हणजेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP leader Nawab Malik) नवाब मलिक हे एकामागोमाग एक आरोप करताना दिसत आहे. नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर नवा आरोप केला आहे. मात्र यावेळी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना त्यांच्या मेहुणी (sister-in-law) संदर्भात सवाल उपस्थित केला आहे. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांना ट्विट करून विचारले आहे की, तुमची मेहुणीही ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? नवाब मलिक यांनी नवा दावा केला आहे की, समीर वानखेडेंची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्याविरुद्ध पुणे न्यायालयात ड्रग्जचा खटला सुरू आहे. आता नवाब मलिक या मुद्द्यावर समीर वानखेडे यांच्याकडून उत्तर मागत आहेत. नवाब मलिक यांनी ट्विट करून समीर वानखेडे यांना सवाल केला की, तुमची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेली आहे का? तिची केस पुणे कोर्टात प्रलंबित असल्यानं तुम्ही या प्रश्नाचे उत्तर दिले पाहिजे. हा याचा पुरावा असल्याचं ट्विट मलिकांनी केला आहे. हेही वाचा-  Aryan Khan ची तब्येत बिघडली, NCB च्या एसआयटी चौकशीला मारली दांडी विशेष म्हणजे आर्यन खानला मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यापासून नवाब मलिक एनसीबीच्या समीर वानखेडेवर सातत्यानं नवनवे आरोप करत आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आपल्या खाजगी लष्करामार्फत ड्रग्ज रॅकेट चालवल्याचा आरोप केला आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या मालमत्तेवरही प्रश्न उपस्थित करत ते कोट्यवधीचे कपडे घालतात, असा दावा केला. हेही वाचा- जीवापेक्षा डायनिंग टेबल ठरला महत्त्वाचा; भाऊबीजेदिवशीच महिलेनं उचललं धक्कादायक पाऊल  यासोबतच नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर फसवणुकीच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोपही केला. मात्र, नवाब मलिक यांनी केलेले सर्व आरोप समीर वानखेडे यांनी फेटाळून लावले आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published: