मुंबई, 02 मार्च : मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik arrest case ) यांना ईडीने (ed) अटक केली आहे. ईडीने लावलेले गुन्हे मागे घ्यावे अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. पण, कोर्टाने तातडीने दिलासा देण्यास नकार दिला आहे. या प्रकरणावर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीने अटक केली होती. त्यांना कोर्टात हजर केले असता 3 मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. ईडीने केलेली कारवाई चुकीची आहे. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केली आहे.
नवाब मलिक यांचे वकिल अमित देसाई यांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला.
'नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कथित सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर आहे. हसीना पारकर ही दाऊदची बहीण आहे. त्याच बरोबर 1993 च्या बॉम्बस्फोटाच्या काही आरोपींची ईडीने स्टेटमेंट घेतली आहे, असं देसाई यांनी कोर्टात सांगितलं.
नवाब मलिक यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी देसाई यांनी केली.
तर कोर्टाने या प्रकरणावर सोमवारी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मलिक यांना सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.