मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आर्यन खानला जामीन मंजूर होताच नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, फिल्मी स्टाईल Tweet करत म्हणाले...

आर्यन खानला जामीन मंजूर होताच नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, फिल्मी स्टाईल Tweet करत म्हणाले...

नवाब मलिक यांनी अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवली आहे.

नवाब मलिक यांनी अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवली आहे.

नवाब मलिक यांनी अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 29 ऑक्टोबर:  बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan)याच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर गुरुवारी 25 दिवसांनी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्याला जामीन मंजूर (Aryan Khan, Munmun Dhamecha, Arbaaz Merchant granted bail) केला आहे. 3 ऑक्टोबर रोजी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एका हायप्रोफाईल क्रूझवरील रेव्ह पार्टीमध्ये (Mumbai Drugs Case) अटक करण्यात आली होती. आर्यन खानला जामीन मंजूर होताच राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अगदी मोजक्या शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवली आहे.

गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आर्यनला जामीन मंजूर झाला. त्यानंतर मलिक यांनी 5 वाजून मिनिटांनी एक ट्विट केलं. त्यांनी प्रतिक्रियाही फिल्मी स्टाईलमध्ये आहे. 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त' एवढंच ट्विट त्यांनी केलं.

मात्र रात्र तुरुंगातच

गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने आर्यन खानसह, मुनमुन धमेचा आणि अरबाज खान यांना जामीन मंजूर केला. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी कालची रात्र आर्यनला तुरुंगात राहावं लागलं. या तिघांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात 3 ऑक्टोबरच्या पहाटे एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं. यांना अटकेत घेतल्यानंतर तिघांनाही 25 दिवसांनी जामीन मंजूर झाला आहे.

मुलाच्या सुटकेनंतर शाहरूखचा पहिला Photo समोर

आर्यनला जामीन मंजूर झाल्यानंतर शाहरुख खान आणि वकील सतीश मानेशिंदे (Advocate Satish Maneshinde) यांच्या टिमसोबतचे फोटो (Shahrukh Khan photos with Satish Maneshinde and team) समोर आले आहेत.

First published:

Tags: Aryan khan, Nawab malik, Shah Rukh Khan