ड्रग्ज प्रकरणात जावयाच्या अटकेनंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. समीर खान (Sameer Khan) याच्या अटकेनंतर नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 14 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातले मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली आहे. जावयाला अटक केल्यामुळे नवाब मलिक अडचणीत आले आहेत. या वादावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 'कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. योग्य न्याय मिळेल. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्णपणे विश्वास आहे,' असं नवाब मलिक म्हणाले.
Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021
दरम्यान एनसीबीच्या टीमने समीर खान (Sameer Khan)च्या वांद्र्यातील घरावर छापा टाकला आहे. करण सजनानी आणि समीर खान यांच्यात ड्रग्ज सप्लायबाबतचं चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाल्यानंतर एनसीबी ही छापेमारी करत आहे.
Mumbai: A raid by Narcotics Control Bureau (NCB) is underway at the residence of Sameer Khan in Bandra, who was arrested yesterday in connection with a drugs case. https://t.co/3vvkiY6StW
समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.