मुंबई, 10 मे : महाराष्ट्र कोरोना संकटाशी लढत असताना आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरूच आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांनी केंद्र सरकारवर जहरी टीका केली आहे. इंधन दरवाढीवरून केंद्रावर टीका करता सरकार जनतेचे खिसे कापण्याचं काम करत आहे, हे सरकार पाकिटमार बनलं आहे का, असा सवाल मलिक यांनी केला आहे. केंद्र सरकारबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि अमित शहांवरही (Amit shah) त्यांनी जोरदार टीका केली आहे.
(वाचा - मराठ्यांचं आरक्षण बांधलं काठीला, सरकार गेलं काशीला, सदाभाऊ खोत यांचं आंदोलन सुरू)
देशात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी तर हा आकडा आधीच पार केला आहे. जगात इंधनाचे दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मलिक यांनी केला आहे. केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे.
केंद्र सरकार जनतेचे खिसे कापण्याचे काम करत आहे. हे सरकार पाकिटमार सरकार बनलेय का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला. देशात कोरोनाचे संकट असताना अशाप्रकारे डिझेल-पेट्रोलच्या किंमती वाढवून लोकांची लूट थांबवावी अशी मागणी @nawabmalikncp यांनी केली आहे.
— NCP (@NCPspeaks) May 10, 2021
देशात डिझेल व पेट्रोलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल काही दिवसांत शंभरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जगात दर कमी असताना भारतात किंमती कशा वाढवल्या जातात, असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ना. @nawabmalikncp यांनी केंद्र सरकारला केला आहे.#FuelPrices pic.twitter.com/akmiyCXN8t
— NCP (@NCPspeaks) May 10, 2021
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर 18 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन देण्यात आलं होतं. त्याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबत ममता बॅनर्जी यांनी एक पत्र लिहिले आहे, असं मलिक यांनी सांगितलं. पण या घोषणेबाबतही मलिक यांनी शंका उपस्थित केली. कदाचित हा केवळ चुनावी जुमला होता असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काही दिवसांनी जनतेला सांगू शकतात. त्यामुळं जी घोषणा केली आहे त्याप्रमाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
निवडणुकीनंतर देशातील प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर १८ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन @PMOIndia यांनी दिले होते. याची आठवण करून देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याबाबत @MamataOfficial यांनी एक पत्र लिहिले आहे. पण या घोषणेबाबत ना. @nawabmalikncp यांनी शंका उपस्थित केलीय. pic.twitter.com/5wCsSDVNIa
— NCP (@NCPspeaks) May 10, 2021
भाजपचे नेते राजभवन हे राजकीय आखाडा बनवत असल्याची टीका मलिक यांनी केली. बंगालचे राज्यपाल ज्यापद्धतीनं राजकीय भाष्य करत आहेत ते पाहता त्यांना राजकारणात रुची दिसते. त्यामुळं राजकारणात रुची असलेल्या राज्यपालांना पंतप्रधान मोदींनी पदमुक्त करावे आणि त्यांना निवडणूक लढवण्याची संधी देऊन मंत्री वा वेगळी जबाबदारी देऊ करावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
(वाचा-निवडणुकीतील पराभवानंतर पार पडली काँग्रेसची बैठक, पक्षात मोठ्या बदलाचे दिले संकेत)
केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. कोरोना लशीचा पहिला डोस घेतलेल्या साडे चार लाख लोकांचा दुसरा डोस अजून बाकी आहे. लस पुरवठा होत नसल्यामुळे ठिकठिकाणी लसीकरण केंद्रावर लोक गर्दी करत आहेत, असा आरोप मलिक यांनी केला. 18-44 वयोगटातील लोकांसाठी लस उपलब्ध नाही. तरीही एकामागून एक निर्णय जाहीर करण्याची घाई केंद्राला लागली आहे, अशी टीका त्यांनी केली. एकूणच विविध मुद्द्यांवरून नवाब मलिक यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आता याला भाजपचे नेते कसे प्रत्युत्तर देणार ते पाहावे लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, Narendra modi, Nawab malik, Petrol and diesel price