• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • नवाब मलिकांचा आणखी एक धमाका, 'Special 26' प्रकरणाबद्दल NCB च्या महासंचालकांकडे तक्रार

नवाब मलिकांचा आणखी एक धमाका, 'Special 26' प्रकरणाबद्दल NCB च्या महासंचालकांकडे तक्रार

नवाब मालिक यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि काही अधिकारी खोट्या केसेस...

नवाब मालिक यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि काही अधिकारी खोट्या केसेस...

नवाब मालिक यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि काही अधिकारी खोट्या केसेस...

 • Share this:
  मुंबई, 26 ऑक्टोबर : आर्यन खान अटक (aryan khan arrest case ) प्रकरणी राष्ट्रवादीचे (ncb) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची मालिका लावली आहे. त्यामुळे एनसीबीची (ncb) पुरती कोंडी झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा मलिक यांनी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या खोट्या प्रकरणाबद्दल पत्र लिहिले होते. आता हेच पत्र  नवाब मलिक यांनी दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मलिक यांना निनावी पत्र लिहिले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोटे प्रकरण केली, याचा खुलासा या पत्रात केला आहे. मलिक यांनी या निनावी पत्रासह एनसीबीच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे. नवाब मालिक यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि काही अधिकारी खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवलं जात असल्याचा आरोप केला होता. मलिक यांनी हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले असून त्यासोबत आपले तक्रार पत्रही पाठवले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट केल्यानंतर पुढील काही मिनिटांत नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं. अवघ्या 24 व्या वर्षी झाली 21 मुलांची आई, असा करते मुलांचा सांभाळ; पाहा PHOTOs 'हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली होती.
  Published by:sachin Salve
  First published: