नवी मुंबईतल्या बारमालकाची हत्या, चालत्या कारमध्ये आवळला गळा

नवी मुंबईतल्या बारमालकाची हत्या, चालत्या कारमध्ये आवळला गळा

चार आरोपींनी त्यांना बोलावून घेतलं होतं. त्यावेळी ते कारमध्ये जात होते. कारमध्येच आरोपींनी लोखंडी सळईने यादव यांची गळा दाबून हत्या केली.

  • Share this:

नवी मुंबई 12 फेब्रुवारी : नवी मुंबईतल्या एका बार मालकाची हत्या झाल्याचं उघड झालंय. हा बार मालक गोव्यात गेला होता. तेथून त्याला मंगळुरूमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्यांची हत्या करण्यात आली. वसिष्ठ यादव असं त्या बार मालकाचं नाव आहे. नवी मुंबईतल्या माया बारचे ते मालक होते. व्यावसायीक वादातून त्यांची हत्या झाल्याची माहिती दिली जातेय.

वसिष्ठ यादव हे गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी गेले होते. त्यानंतर त्यांना बंगळुरुला बोलविण्यात आलं. तेथून मंगळुरुत नेण्यात आलं होतं. चार आरोपींनी त्यांना बोलावून घेतलं होतं. त्यावेळी ते कारमध्ये जात होते. कारमध्येच आरोपींनी लोखंडी सळईने यादव यांची गळा दाबून हत्या केली.

या घटनेनंतर चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. हत्या नेमकी कुठल्या कारणांमुळे झाली याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा...

मंत्र्यांच्या बंगल्यांवर 15 कोटींची उधळपट्टी, कुठल्या नेत्यांसाठ किती रुपये?

मुंबई 23 बांगलादेशींना अटक, 'मनसे'च्या मोर्चानंतर पोलिसांची धडक कारवाई

सोन्याच्या अंगठ्या चोरताना अभिनेत्रीला अटक, पुण्यातल्या मॉलमधली घटना

First published: February 12, 2020, 4:15 PM IST
Tags: new mumbai

ताज्या बातम्या