मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

नौदलातील पतीने तिच्या मानेवर पाय ठेवला अन्...; लेकीच्या मृत्यूनंतर पित्यानं सांगितली व्यथा

नौदलातील पतीने तिच्या मानेवर पाय ठेवला अन्...; लेकीच्या मृत्यूनंतर पित्यानं सांगितली व्यथा

Crime in Mumbai: भारतीय नौदलातील एका जवानाच्या पत्नीने 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी मृत तरुणीच्या पित्याने आपल्या लेकीची व्यथा पोलिसांना सांगितली आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 ऑक्टोबर: भारतीय नौदलातील एका जवानाच्या पत्नीने 11 ऑक्टोबर रोजी मुंबईत आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात आरोपी पतीसह सासरच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मृत विवाहितेच्या वडिलांनी पोलिसांना लेकीवरील आपबीती सुनावली आहे. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी मोठं कायदेशीर पाऊल उचललं आहे. यानंतर आता मुंबई पोलीस आरोपी कुटुंबाला पश्चिम बंगालमधून मुंबईला घेऊन येणार आहेत. नेमकं प्रकरण काय आहे? पूजा चाकी असं 23 वर्षीय मृत विवाहितेचं नाव आहे. तिने 11 सप्टेंबर रोजी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली असा संशय पोलिसांना आहे. आरोपी पती कल्याण चाकी यानेच पुजाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मृत पूजाच्या वडिलांनी केला आहे. पूजाचे वडील डॉ. तपन मंडल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृत पूजा आणि आरोपी कल्याण यांचा 25 नोव्हेंबर 2020 रोजी पश्चिम बंगालमधील कल्याणशी विवाह झाला होती. लग्नानंतर काही दिवसातचं आरोपी पतीने आणि सासरच्या मंडळींनी पुजाचा छळ करायला सुरुवात केली. आरोपीनं अनेकदा पूजाला शिवीगाळ करत जबरी मारहाण केली आहे. हेही वाचा-मित्रानेच दिला दगा; पुण्यात तरुणीला ज्यूसमधून गुंगीचं औषध देत घृणास्पद कृत्य तसेच आरोपींनी जमीन खरेदी करण्यासाठी पुजाकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी मंडल यांनी आपल्या लेकीला साडेतीन लाख रुपये दिले होते. तरीही आरोपींचा तिला त्रास सुरू होता. तिला एकदा माहेरी देखील आणण्यात आलं होतं. पण आरोपी पती कल्याण तिला परत घेऊन गेला. यानंतर आरोपी तिला शिवीगाळ करत मारहाण करत होता. आत्महत्या करण्याच्या एक दिवस आगोदर पुजाने आपल्या वडिलांना फोन करून मदतीसाठी रडत होती. हेही वाचा-  प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीला दिला रोज थोडा-थोडा मृत्यू;पत्नीचा कांड वाचून हादराल फिर्यादी मंडल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं की, “माझ्या मुलीने मला सांगितलं की, आरोपी पतीने तिच्या मानेवर पाय ठेवून तिला अमानुष पद्धतीने मारहाण केली आहे. यावेळी तिने रडत मला विनंती केली, की तुम्ही मुंबईला या आणि मला पश्चिम बंगालला घेऊन जा. 10 ऑक्टोबरलाही तिने मला रात्री फोन केला आणि मदतीसाठी रडत होती, ” या घटनेनंतर मृत पुजाने मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासांत तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याच्या अवस्थेत आढळली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Mumbai

पुढील बातम्या