मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

धक्कादायक! कोरोनावर मात करणाऱ्या नवनीत राणांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

धक्कादायक! कोरोनावर मात करणाऱ्या नवनीत राणांचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह

खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते.

मुंबई, 18 ऑगस्ट : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी कोरोनावर मात केली होती. पण, आता मुंबई महापालिकेनं पुन्हा एकदा तपासणी केली असता धक्कादायक रिपोर्ट आला आहे.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना दोन दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला होता. खुद्द नवनीत राणा यांनी आपण रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं होतं.

पण, आज मुंबई महानगर पालिकेच्या डॉक्टरांनी नवनीत राणा  आणि रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही रिपोर्ट पॉजिटिव्ह आले आहे. दोघांचेही कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबई पालिकेच्या डॉक्टरांनी राणा दाम्पत्यांना 15 दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील 15 दिवस नवनीत राणा या क्वारंटाइन राहणार आहे.

खासदार नवनीत राणा यांना 6 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 12 सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले होते. सुरुवातील नवनीत राणा यांच्यावर अमरावतीत उपचार करण्यात आले होते. पण श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण, नागपूरमध्येही उपचारादरम्यान नवनीत राणा यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे 13 ऑगस्ट रोजी नवनीत राणा यांना तातडीने मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. लीलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. अखेर, उपचाराअंती त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, आता परत कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

First published: