Home /News /mumbai /

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा 4वर, वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनामुळे मृतांचा आकडा 4वर, वाशीमध्ये एका महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, 26 मार्च : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढत चालली आहे. वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात झालेला महिलेचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या 4 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे आज पुन्हा दोन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती अशीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 124 वर पोहोचला आहे. अशा नागरिकांची चिंता वाढली आहे. डॉक्टरांचा दावा, भारतात कोरोनामुळे नाही वाढणार मृतांची संख्या, कारण.... मुंबईत प्रभादेवी भागात महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईमध्ये प्रभादेवी भागामध्ये एका महिला फेरीवाली कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी परिसरामध्ये असलेल्या एका कॉर्पोरेट ऑफिसजवळ ही महिला भोजन विक्रीचा व्यवसाय करत आहे. असं वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्वांना शोधून त्यांची केली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. चाचण्या करण्यासाठी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं असून त्यांचे रिपोर्ट येणं बाकी आहे. मुंबई महापालिकेकडून ही माहिती देण्यात आली आहे. याच भागात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 649 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात  दरम्यान, भारतातील (India) कोरोनाग्रस्त (Coronavirus) रुग्णांचा आकडा वाढला आहे. एकूण 649 रुग्ण कोरोनाव्हायरसच्या विळख्यात आहे. आज देशभरात कोरोनाचे 43 नवे रुग्ण समोर आले. त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 43 रुग्ण बरे झाले आहेत. सिलेब्रिटी शेफ फ्लॉएड कार्डोजचा कोरोनामुळे मृत्यू, मुंबईत दिली होती पार्टी
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या