निर्दयी, एक दिवस डब्यातील भाकरी दिली नाही म्हणून धारदार शस्त्राने भोसकलं

निर्दयी, एक दिवस डब्यातील भाकरी दिली नाही म्हणून धारदार शस्त्राने भोसकलं

नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील बोनसारी गावामधील 52 वर्षीय रहिवासी शरयू प्रसाद मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 20 जुलै : नवी मुंबईतील तुर्भे परिसरातील बोनसारी गावामधील 52 वर्षीय रहिवासी शरयू प्रसाद मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. मिश्रा दगडखाण आणि डांबरप्लांटवर वॉचमन म्हणून काम करत होते. केवळ जेवणाचा डबा घेण्यासाठी ते घरी येत असत. ते नेहमी त्यांच्या डब्यात जास्तीची भाकरी घेऊन जायचे. कारण ते त्यांची एक भाकरी ते गावात अनोळखी धनकुमार राय यांना देत असत. पण एक दिवस भाकरी न दिल्यामुळे त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या निर्दयी प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. खरंतर माणूसकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना आहे.

ते झालं असं की, शरयू हे नेहमी जेवनाच्या डब्यात दोन भाकरी अधिक घेऊन जात असत. कारण बोनसारी परिसरामधील डोंगरावर एक  अनोळखी धनकुमार राय नावाचा इसम वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, राहत होता. तो कधी-कधी खाली नागरी वस्तीमध्ये यायचा. त्याला स्थानिक नागरिक भाकरी द्यायचे. त्यामुळे शरयूही त्याला त्यांच्या डब्यातली भाकरी द्यायचे.

लोकसभेतली अविश्वास ठरावाची लढाई कोण जिंकणार? 11 वाजता मतदानाला सुरूवात

पण काल मिश्रा यांना उपवास असल्यामुळे ते जेवण घेऊन गेले नव्हते. नेहमी प्रमाणे डोंगरावर राहणारा धनकुमार शरयूकडे आला आणि त्याने जेवणाची मागणी केली असता मिश्रा जेवण देऊ न शकल्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादात चिडलेला धनकुमार राय याने रागाच्या भरात आपल्या जवळील धारधार शस्त्राने मिश्रा यांच्यावर वार करून त्यांची हत्या केली. दोन ते तीन तासाच्या अथक प्रयत्नाने तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपीला घनदाट जंगलातून वाट काढुन ताब्यात घेतलं. पुढील तपास तुर्भे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेही वाचा...

Loading...

VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2018 09:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...