नवी मुंबईकरांच्या खिशाला कात्री; एनएमएमटीच्या नॉन एसी बसचं तिकीट महागणार

नवी मुंबईकरांच्या खिशाला कात्री; एनएमएमटीच्या नॉन एसी बसचं तिकीट महागणार

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या नॉन एसीच्या बस प्रवासी भाड्यात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

  • Share this:

07 फेब्रुवारी : नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएमटीच्या नॉन एसीच्या बस प्रवासी भाड्यात 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र एसी बसच्या प्रवासी भाड्यात 25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेची परिवहन सेवा विविध कारणांमुळे तोट्यात आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात आला आहे. पण महापालिकेच्या या निर्णयामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार हे नक्की.

एका बाजूला महापालिका तोट्यात तर दुसऱ्या बाजूला ओला, उबेरमुळे एसी बसच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी अधिकाधिक प्रवासी एसी बसकडे वळावेत यासाठी एसी बसचं भाडं 25 टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. आणि नॉन एसी बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे.

नॉन एसी बसची करण्यात आलेली भाडेवाढ ही 12 किलोमीटरच्या पुढे करण्यात आल्यानं याचा फटका प्रवाशांना बसणार नसल्याचं नवी मुंबई महापालिकेतर्फे सांगण्यात आलं आहे. तसंच एनएमएमटीची ही भाडेवाढ बेस्ट आणि एसटीच्या तुलनेत कमी असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 7, 2018 09:19 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading