सगळ्यात जास्त रुग्ण आहेत डेंग्यूचे पण पालिका लसीकरण करणार टायफॉईडचे!

सगळ्यात जास्त रुग्ण आहेत डेंग्यूचे पण पालिका लसीकरण करणार टायफॉईडचे!

नवी मुंबईच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 4 लाख मुलांना टायफॉईडची लस दिली जाणार आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 13 जुलै : नवी मुंबईच्या आरोग्य विभागाकडून शहरातील 4 लाख मुलांना टायफॉईडची लस दिली जाणार आहे. या लसीकरणाकरता 6 कोटी रूपये पालिकेकडून खर्च केले जाणार आहेत. नवी मुंबईत दरवर्षी 4 ते 5 हजार टायफॉईडचे रूग्ण आढळतात असं भासवून हा लसीकरणाचा घाट घातला जातोय.

5 हजार रूग्ण असल्याचं सांगणाऱ्या पालिकेच्या रेकॉर्डवर यावर्षी फक्त तीनच रूग्ण असल्याचं न्यूज 18 लोकमतनं पुराव्यासह उघड केलं आहे. टायफॉईडपेक्षा डेंग्यू आणि क्षयरोगाच्या रूग्णांची संख्या वाढतेय. पण त्याबाबत मात्र पालिका फारशी गंभीर नसल्याचं दिसून येतंय. त्यामुळं मग हा लसीकरणाचा घाट नेमका कोणाच्या फायद्यासाठी घातला जातोय असा प्रश्न उपस्थित होतोय.

माझ्या कोहिनूरसाठी प्रार्थना करा, सायरा बानो यांचं भावनिक आवाहन

या सगळ्या कारभारामुळे नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची पोलखोल झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. शहरात फक्त 3 रुग्ण टायफॉईडचे आढळलेत तरी देखील महापालिका बळजबरीने शहरातील 4 लाख मुलांना टायफॉईडची लस देणार आहे.

नवी मुंबईत कर्करोग, क्षयरोग आणि डेंगीचे रुग्ण वाढताहेत. यामध्ये मृतांचा आकडा वाढत असताना महापालिका या जीवघेण्या आजारांवर खर्च न करता टायफॉईडचे रुग्ण नसतानाही त्यांच्यावर तब्बल 6 कोटी रुपये खर्च केले जाताहेत.

पारदर्शी कारभार करणाऱ्या महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांची देखील प्रकरणात दिशाभूल केली जातेय का तसेच आयुक्त रामास्वामी या लसीकरण मोहिमेच्या प्रकरणाची पुन्हा प्रकरणाची तपासणी करणार का असा सवाल नवी मुंबईकर करताहेत.

हेही वाचा...

इम्रान खानचे भारतात 5 मुलं, समलैंगिक संबंधही ठेवले; पहिल्या पत्नीचा आरोप

VIDEO : लोकल थांबताच साप आला धावून

VIDEO...तर हवेतच झाली असती विमानांची टक्कर, बंगळुरूच्या आकाशातला थरार!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2018 08:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading