Home /News /mumbai /

भाजपला धक्का देण्यासाठी महाविकासआघाडीचा पुढचा प्लॅन ठरला! उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होणार मोठी घोषणा

भाजपला धक्का देण्यासाठी महाविकासआघाडीचा पुढचा प्लॅन ठरला! उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होणार मोठी घोषणा

महापालिका निवडणुकांमध्येही भाजपला एकटं पाडत धूळ चारण्याचा प्लॅन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीने आखला आहे. उद्या नवी मुंबईच्या कार्यकर्त्या मेळाव्यात यासंबंधी मोठी घोषणा होऊ शकते.

    मुंबई, 3 जानेवारी : उद्या महाविकासआघाडीच्या नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांचा एकत्र मेळावा होणार आहे आणि त्यात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेची चाहूल सोमवारी महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांच्या बैठकीत लागली. सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. नवी मुंबईच्या प्रकल्पग्रस्तांविषयी धोरण ठरवण्यासाठी ही बैठक झाली. त्यामध्ये नवी मुंबई महापालिका राजकारणावरही चर्चा झाली, असं समजतं. येत्या एप्रिलमध्ये राज्यातल्या या महत्त्वाच्या महापालिकेची निवडणूक होणार आहे. ही निवडणूक महाविकासआघाडी एकत्रित लढवण्याची शक्यता आहे. तशी घोषणा मंगळवारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात होऊ शकते, असं राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी सांगितलं. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसदर्भात आज बैठक झाली. या प्रकल्पग्रस्तांना अधिकृतपणे जागा देण्यासाठी धोरण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याशिवाय एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड असे नेते या बैठकीला उपस्थित होते. नवी मुंबई मनपात महाविकासआघाडीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने डावपेच सुरू झाले आहेत. या महापालिका निवडणुकीत भाजपला एकटं पाडत प्रमुख पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडीच्या फॉरम्युलाच वापरायचा, असं ठरलं आहे. नवी मुंबईत वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. यामध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने आराखडे ठरवले जातील. सोमवारी मुंबईत महाआघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित होते. नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या प्रश्नांविषयी पत्र लिहिली होती. त्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. --------------------------- अन्य बातम्या सोशल मीडियावर चव्हाण आणि थोरात समर्थकांची बॅटिंग; काँग्रेसमधली अंतर्गत स्पर्धा 'भाजपचं सरकार राज्यांत पुन्हा येणार, हा नेता 100 टक्के मंत्री होणार' स्वबळावर लढता लढता विधानसभेला युती कशी झाली? CM उद्धव ठाकरेंनी केला खुलासा 'Accidental Chief Minister' वर उद्धव ठाकरे काय म्हणाले?, पाहा VIDEO
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    पुढील बातम्या