मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नवी मुंबई पालिकेचा अजब कारभार, नव्या वसुलीने नागरिक वैतागले

नवी मुंबई पालिकेचा अजब कारभार, नव्या वसुलीने नागरिक वैतागले

पालिकेच्या या अजब कारभाराला नागरिक वैतागले असून यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना पैसे आकारणी बंद करावी अशी मागणी केलीय.

पालिकेच्या या अजब कारभाराला नागरिक वैतागले असून यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना पैसे आकारणी बंद करावी अशी मागणी केलीय.

पालिकेच्या या अजब कारभाराला नागरिक वैतागले असून यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना पैसे आकारणी बंद करावी अशी मागणी केलीय.

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

प्रमोद पाटील, नवी मुंबई, 01 एप्रिल : स्वत:च्याच घराबाहेर गाडी पार्क केलेल्या नागरिकांकडून नवी मुंबई पालिकेकडून पैसे आकारले जात असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पालिकेच्या या अजब कारभाराला नागरिक वैतागले असून यावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त करताना पैसे आकारणी बंद करावी अशी मागणी केलीय. नवी मुंबईतील गृहनिर्माण सोसायटीच्या बाहेर गाडी पार्क करणाऱ्या नागरिकांना पालिकेकडून पैसे आकारणी केली जाते. 24 तासांसाठी 240 रुपये आकारले जात आहेत. यासाठी पालिकेने ठेकेदार नेमले आहे.

पार्किंगचे दरफलक झाडांवर लटकवले आहेत. पार्किंगची व्यवस्था करून देण्याची जबाबदारी पालिकेची असताना याचा नाहक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. यामुळे नागरिक याबाबत संताप व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आपल्याच इमारतीच्या बाजूला गाडी पार्क करणाऱ्या नागरिकांना पैसे भरावे लागत आहेत. पालिकेला कर भरत असताना पालिका आमच्याकडुन पैसे उकळण्याचा नवीन फंडा वापरला असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे.

हद्द झाली! बापट यांच्या निधनानंतर 48 तासांत भावी खासदाराचं बॅनर, भाजप नेता ट्रोल 

याबाबत स्थानिक रहिवाशी अवधूत मोरे यांनी अनेक नागरिकांचे तक्रार पत्र घेऊन ते पालिका प्रशासनाला दिले जाईल असं म्हटलंय. तसंच यावर योग्य तोडगा काढून हे पार्किंगचे पैसे घेणे बंद करावे अशी विनंती केलीयी. तसे न झाल्यास आम्हाला न्यायासाठी वेगळा मार्ग निवडावा लागेल अशी इशारावजा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

पैसे आकारूनही ठेकेदाराने फलकावर गाडी पार्किंग करताना आपल्या जबाबदारीवर करावी त्याला पालिका वा ठेकेदार जबाबदार नसेल अशी अजब सूचना लिहून ठेवली आहे. त्यामुळे एका बाजूला चुकीच्या पद्धतीने पार्किंग पैसे वसूल करायचे आणि त्याची जबाबदारीही गाडी मालकावर ढकलून द्यायची हा अजब प्रकार सध्या पालिकेच्या अनेक परिसरात दिसून येत आहे.  याबाबत पालिका शहर अभियंता संजय देसाई यांच्या मते ही वसुली मोठी नसून पार्किंग करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी उचललेले पाऊल आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र आता अशी पार्किंग वसुली कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai