Home /News /mumbai /

नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीसाठी खुशखबर

नवी मुंबई महापालिका निवडणुकीआधी महाविकास आघाडीसाठी खुशखबर

नवी मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मुंबई, 2 मार्च : दिग्गज नेते गणेश नाईक यांनी पक्ष सोडल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत गणेश नाईक विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात जोरदार घमासान पाहायला मिळणार आहे. मात्र या निवडणुकीआधी महाविकास आघाडीसाठी एक चांगली बातमी मिळाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई कृषी बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पॅनलने बाजी मारली आहे. शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला. नवी मुंबई महापालिका निवडणूक लागत आहे. येत्या काही दिवसांत भाजपचे आणखी काही नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करतील. नवी मुंबई महापालिकेतही महाविकास आघाडी जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. नवी मुंबईत होणार जोरदार घमासान नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आता गणेश नाईक यांच्या गटाचा नवी मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही जबाबदारी पक्षाचे नेते शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली आहे. गणेश नाईकांच्या साम्राज्याला सुरुंग काही दिवसांपूर्वी भाजपच्या 4 नगरसेवकांनी राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत या चारही नगरसेवकांनी शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे येऊ घातलेल्या पालिकेच्या निवडणुकांआधी हा भाजप आणि आतापर्यंत नवी मुंबईचा गड राखणाऱ्या गणेश नाईकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेही वाचा- मनसे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल राष्ट्रवादी-शिवसेनेनं पणाला लावली ताकद काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं. नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्यानंतर आता वातावरण तापू लागलं आहे. ही महापालिका निवडणूक काँग्रेस, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे लढवणार आहेत. याच निवडणुकीची तयारी म्हणून वाशी येथे महाआघडीचा मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते आणि आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गणेश नाईक आणि कुटुंबावर घणाघाती टीका केली. 'आगामी निवडणुकीनंतर नवी मुंबईत कुणी महापौर होईल, कुणी स्थायी समिती अध्यक्ष होतील, कुणी सभापती होतील, पण नाईक कुटुंबातील कुणी काहीही होणार नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटले. महाआघाडीच्या नवी मुंबईतील मेळाव्याला अजित पवार, एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण हे नेते उपस्थित होते. 'ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात. नवी मुंबईतील एकाधिकार शाही खपवून घ्यायची नाही,' असं म्हणत अजित पवार यांनी नाईक कुटुंबाच्या नवी मुंबईतील वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी महाआघाडीच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं. तसंच ज्या पदाधिकाऱ्यांना नगरसेवकपद मिळणार नाही, त्यांना महामंडळ आणि जिल्हा समित्यांवर घेणार, असं म्हणत अजित पवार यांनी संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी सावध पवित्रा घेतला.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: NCP, Shashikant shinde

पुढील बातम्या