नवी मुंबई, 27 डिसेंबर : एकीकडे सध्या संपूर्ण देश हा महिला आणि मुलींवरील अत्याचारामुळे हादरला आहे. दुसरीकडे मुलगी आपत्य नको म्हणून गर्भातच त्यांना मारले जाते. मात्र या सगळ्यांना अपवाद ठरत नवी मुंबईतील एका बापानं आपल्या लेकीच्या पहिल्या वाढदिवसाला भजन-किर्तन ठेवत तिच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर वाढदिवसादिवशी गणपती बाप्पालाही घरी निमंत्रण दिले.
नवी मुंबईतील पुजारी राजकुमार यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस ज्याप्रकारे साजरा केला, ते पाहून अभिमानाने ऊर भरून येईन. बाप-लेकीचे प्रेम सगळ्यांनाच माहित आहे. पण याच लेकीचा समाजात मान मिळावा आणि सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी राजकुमार मिश्रा नावाच्या ब्राम्हणाने एक वेगळाच आदर्श सगळ्यांसमोर ठेवला आहे.
वाचा-बर्नोल द्या, असं सांगणार नाही, आदित्य यांचा 'ठाकरे टोला', पाहा हा VIDEO
राजकुमार हे नवी मुंबईतील एका गणेश मंदिरात ब्राम्हण आहेत. आपल्या लेकीचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यासाठी यांनी चक्क गणपती बाप्पाला आमंत्रण दिले. त्यासाठी रंगीत फुलांची आरास करत संपूर्ण मंदिर बालगणेशासाठी सजवले.
वाचा-दिव्यांग असूनही असा साधला फोनवर संवाद, आनंद महिंद्रांनी शेअर केला VIDEOवाचा-HONOR ने टेक्नो सॅव्हींसाठी आणलीय स्मार्टफोनमध्ये क्रांती, नव्या पिढीसाठी टेकचिक
एवढेच नाही तर एकीकडे पाश्चिमात्य पध्दतीने वाढदिवस साजरे केले जात असताना मिश्रा यांनी मुलीच्या या खास दिवशी 2 दिवस रामायणाचे पठण केले.
भजन आणि किर्तन करत आपल्या लेकीला शुभेच्छा दिल्या. तसेच, लेकीच्या उदंड आयुष्यासाठी दीपप्रज्वलनाने मंदिर उजाळून टाकले.
वाचा-शोएब मलिकनं फोटो पोस्ट करत घेतला धोनीशी पंगा, चाहत्यांनी ट्विटरवर काढली इज्जत
या अनोख्या वाढदिवसाची संपूर्ण नवी मुंबईत चर्चा होत आहे. आजूबाजूच्या परिसरात लेकीच्या जन्मापासून आतापर्यंतचे सर्व फोटोही बॅनर करुन लावण्यात आले. त्यामुळं राजकुमार यांनी अशाप्रकारे आपल्या मुलीचा वाढदिवस साजरा करत एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.