News18 Lokmat

मुंढेंनी बडतर्फ केलेला भ्रष्ट अधिकारी पुन्हा सेवेत

तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेचे सह शहर अभियंता जी.व्ही.राव यांना भ्रष्टाचाराच्या मुद्याखाली महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडला होता

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2017 10:05 AM IST

मुंढेंनी बडतर्फ केलेला भ्रष्ट अधिकारी पुन्हा सेवेत

13 एप्रिल : नवी मुंबई महापालिकेतील स्थायी समितीने चक्क एका भ्रष्ट अधिकाऱ्याला पुन्हा सेवेत घेतलंय. त्याची मूळपदावर पुनर्नियुक्ती करण्याचा मार्ग मोकळा झालाय.

तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबई महापालिकेचे सह शहर अभियंता जी.व्ही.राव यांना भ्रष्टाचाराच्या मुद्याखाली महापालिकेच्या सेवेतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर मांडला होता. तो प्रस्ताव तेंव्हाही नामंजूर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे राव यांना पुन्हा पालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आलंय.

जी.व्ही.राव यांनी शहरातील वीज वाहिन्या भूमीगत करण्यासाठीच्या 50 कोटींच्या कामात वीज मंडळाची परवानगी घेण्यापूर्वीच कंत्राटदाराला कंत्राट देऊन पैसे अदा केले होते. वीज बचतीचा प्रस्ताव 2 कोटींच असताना 5 कोटी विना परवानगी कंत्राटदाराला दिल्याचा ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस व्हीजेटीआयच्या चौकशी समितीने केली होती.

त्यामुळेच मुंढे यांनी राव यांच्यावर कारवाई केली होती. मात्र स्थायी समितीने आज याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन त्यांना सेवेत घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत शिवसेना आणि भाजपने विरोधात मतदान केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...