Home /News /mumbai /

विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं अखेर निलंबन; गृह खात्याचा मोठा निर्णय

विनयभंग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं अखेर निलंबन; गृह खात्याचा मोठा निर्णय

विनयभंगाचा आरोप असणारे नवी मुंबईचे DIG निशिकांत मोरे यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. मोरेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे.

    मुंबई, 9 जानेवारी : विनयभंगाचा आरोप असणारे नवी मुंबईचे DIG निशिकांत मोरे यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. मोरेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गृह विभागाने ही मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांना धमकावल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंच्या गाडीचा चालकही दिनकर साळवे निलंबित झाला आहे. नवी मुंबईत डीआयजी  निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. याप्रकरणी मोरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही लगेच निलंबनाची कारवाई केली. उद्धव ठाकरेंकडे ड्रायव्हर असल्याचा दावा करणाऱ्या दिनकर साळवेने या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवलं, असा आरोप तिच्या पालकांनी केला होता. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली. संबंधित - नवी मुंबईतील DIG विनयभंग प्रकरणाला नवं वळण, उद्धव ठाकरेंच्या नावाने धमकावलं पनवेल कोर्टात परवा दुपारी निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. काय आहे प्रकरण? खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार आहे,' असं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. एका व्हिडीओवरून निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करताना विनयभंग केल्याचं मुलीने तक्रारीत म्हटलं होतं. नवी मुंबईत 5 जून रोजीचा हा प्रकार झाला होता. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मुलीचे कुटुंब तणावात होते. अखेर 26 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यात मोरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला. ------------ अन्य बातम्या सारथीचा वाद पेटला, छञपती संभाजीराजे उपोषणाला बसणार 33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO बँक घोटाळा प्रकरण,NCPचे आमदार अनिल भोसले आणि त्यांच्या पत्नी विरोधात गुन्हा या खेकड्याच्या नांग्या ठेचा, तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिकांची बॅनरबाजी कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का?
    Published by:Arundhati Ranade Joshi
    First published:

    Tags: Molestation Case, Navi mumbai

    पुढील बातम्या