नवी मुंबई, 9 जानेवारी : नवी मुंबईत डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केलेली बेपत्ता तरुणी सापडली असल्याची माहिती समोर येत आहे. देहराडूनमधून या पीडित तरुणीला मुंबईत आणलं असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. एका 19 वर्षीय मित्रासोबत तरुणीला मुंबईत आणल्याचं सांगण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पीडित तरुणी बेपत्ता होती. तिने घरातून निघून जाताना एक सुसाईड नोट लिहिली होती. त्यादिवसापासून पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईवरून तब्बल 1700 किलोमीटर दूर या तरुणीचा शोध लागला आहे.
घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अखेर सापडली आहे. खरंतर या प्रकरणाची अनेक वळणं समोर आली होती. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवेकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला होती. पालकांच्या या दाव्यामुळे खळबळ उडाली होती.
पनवेल कोर्टात निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
इतर बातम्या - हवेत उडाली फॉर्च्यूनर कार आणि दोन गाड्यांवर जाऊन आदळली, थरारक LIVE VIDEOपीडित मुलीने लिहिली होती सुसाईड नोट
खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाली होती. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
इतर बातम्या - बजाजची 'चेतक' 14 वर्षांनी नव्या रुपात धावणार, अशी आहेत फीचर्स आणि किंमत
'मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार आहे,' असं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं होतं. या संपूर्ण प्रकरणामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती. एका व्हिडीओवरून निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होती. वाढदिवस साजरा करताना विनयभंग केल्याचं अप्लवयीन तरुणीने तक्रारीत म्हटलं होतं.
नवी मुंबईत 5 जून रोजीचा हा प्रकार झाला होता. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मुलीचे कुटुंब तणावात होते. अखेर 26 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यात मोरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.