नवी मुंबई, 10 ऑक्टोबर: नवी मुंबईत (Navi Mumbai) भररस्त्यात तरुणावर वार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सीवूड येथील ग्रॅड सेंट्रल मॉलच्या बाहेर तरुणावर वार करण्यात आले. भरचौकात कोयत्यानं वार झाल्यानं लोकांमध्ये दहशत पसरली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
नवी मुंबई: भर चौकात कोयत्याने वार झाल्याने लोकांमध्ये दहशत pic.twitter.com/w5yR3VkZym
— News18Lokmat (@News18lokmat) October 10, 2021
मॉलमध्ये माथाडींचे काम घेण्यावरुन आपपसात वाद झाला आणि त्यातून ही घटना घडली आहे. माथाडी कामगार युनियनमध्ये वॉर युद्ध झालं.
हेही वाचा- 'पाहुणे अजून गेले नाहीत', 100 तासांपासून पार्थ पवारांच्या कार्यालयात IT ची कारवाई सुरुच
या घटनेत जखमी झालेल्या ब्रिजेश पाटीलवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ब्रिजेशच्या पाठीवर, पोटावर, पायावर गंभीर दुखापत झाली आहे.
हेही वाचा- ''तुला तुझ्या पप्पांनी घरी बोलवलंय'', नाशकात लॉजवर नेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग
आरोपी मिलिंद भोईर, मनोहर नाईक आणि इतर चार लोकांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी मिलिंद भोईरवर याआधीही गुन्हे दाखल आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai