वळणावर मृत्यूने गाठलं, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

वळणावर मृत्यूने गाठलं, भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

कार चालक हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं

  • Share this:

01 एप्रिल : आपला देश रस्त्यावर होणाऱ्या मृत्यूंमध्ये जगात पहिला का आहे, याचा प्रत्यय काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा आला. रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला भरधाव कारने उडवलं. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

नवी मुंबईतील खारघरमध्ये ही घटना घडलीये. शिल्प चौकाजवळ सुरेखा शर्मा (60) या रोजची खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या होत्या. घरी परतताना त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यांचं नीट लक्षही होतं. पण समोरून अचानक एका भरधाव कारने टर्न घेतला आणि कारने महिलेला जोरात उडवलं. सुरेखा जोरात रस्त्यावर आदळल्या आणि त्यांच्या डोक्याला जबरं मार लागला. त्यांना तातडीने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण  उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कार चालक हा 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा होता  पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. अशा केसेसमध्ये ज्याची गाडी आहे, त्याला अटक करण्यात येतं. गाडी मुलाच्या वडिलांच्या नावावर होती. त्यांचं एक महिन्यापूर्वीच निधन झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2017 05:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading