S M L

नवी मुंबईत बाईक रेसिंगमुळे एकाचा नाहक बळी,अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

सोमवारी मध्य रात्री 1 वाजता अमन तेलंग आणि त्याची मैत्रीण पूजा याची इतर मित्रा सोबत तुर्भे वाशी मार्गावर बाईक रायडिंगची स्पर्धा लागली होती.

Sachin Salve | Updated On: May 31, 2017 04:51 PM IST

नवी मुंबईत बाईक रेसिंगमुळे एकाचा नाहक बळी,अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

31 मे : नवी मुंबईत महागड्या बाईकच्या रेसिंगमध्ये एक निरपराध व्यक्तीचा बळी गेलाय. या प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही.

सोमवारी मध्य रात्री 1 वाजता अमन तेलंग आणि त्याची मैत्रीण पूजा याची इतर मित्रा सोबत तुर्भे वाशी मार्गावर बाईक रायडिंगची स्पर्धा लागली होती. याच दरम्यान पेट्रोल भरवण्यासाठी जाणाऱ्या ज्ञानेश्वर वाळुंज याच्या गाडीला अमन तेलंग याने जोरदार ठोकल्याने वाळुंज यांचा मृत्यू झालाय. तर अमन जखमी आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तब्बल दोन तास वाळुंज यांना वाशीतील मनपा रुग्णालयात आणि फोरटीस रुग्णालयात उपचार न मिळाल्याने वाळुंज याचा मृत्यू झालाय. तर दुसरीकडे धनदांडग्याच्या या मस्तवाल तरुणांवर पोलीस कारवाई करण्यास दिरंगाई करत असल्याचं समोर आलंय.बाईक रायडिंग करणाऱ्या या मस्तेवाल तरुणांवर पोलीस कधी कारवाई करणार ?. आणखीन किती निरपराधाच्या बळीची पोलीस वाट पाहताहेत असा सवाल नवी मुंबईकर करताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 31, 2017 04:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close