नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला हादरा, भाजपचे 5 नगरसेवक राजीनामा देणार

नवी मुंबईत गणेश नाईकांच्या साम्राज्याला हादरा, भाजपचे 5 नगरसेवक राजीनामा देणार

नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे.

  • Share this:

मुंबई 13 फेब्रुवारी : नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपच्या 5 नगरसेवकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय. हे सर्व नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत. तुर्भेतील नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि त्याच्या सोबत असलेल्या 4 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केल्याने त्यामुळे गणेश नाईकांना जोरदार धक्का बसलाय.

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महापालिकेतल्या सर्व नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष ही राष्ट्रवादीची सत्ता आहे.

नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.

नवऱ्याचे अश्लिल VIDEO पाहिल्याचा राग, त्याने बायकोलाच पेट्रोल टाकून जाळलं

नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांची गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेसोबत जवळीक होती. त्यांचा हा अघोषित शिवसेना प्रवेश मानला जात होता.

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेही चांगलेच सक्रिय झाले आहेत. अशातच नगरसेवक फुटीची बातमी समोर आल्याने गणेश नाईक यांच्या अडचणी वाढू शकतात.

मला गोळ्या घालून मारून टाका, हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर आरोपीची प्रतिक्रिया

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 13, 2020 02:36 PM IST

ताज्या बातम्या