रत्नागिरी, 23 जून : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील पेवे गावातील लोकांना स्मशानभूमी नसल्याने मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये संततधार बसरत आहे. त्यात कोकणातील अनेक जिल्ह्याला पावसाचा फटका सहन करावा लागत आहे. दरम्यान रत्नागिरीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तेथील नागरिकांना होणार त्रास समोर येत आहे.
धो-धो कोसळणार्या पावसात उघड्यावर मृतदेहाला मुखाग्नी देताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही वेळेला पावसामुळे प्रेत अर्धवट जळून विटंबना झास्या सारखा प्रकार सुद्धा घडत आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने गावातील लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पेवे गावातील स्मशान शेड निसर्ग चक्रीवादळात उध्वस्त झाली होती. या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होऊन गेला.
हे ही वाचा-मुंबईत यंदा कसा असेल गणेशोत्सव; मंडळांच्या भूमिकेमुळे सरकारचं टेन्शन वाढणार?
परंतु या कालावधीत ग्रामस्थांनी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा स्मशानभूमीची स्मशान उभारण्यात आले नाही त्यामुळे लोकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. पावसामुळे प्रेताचा विटंबना केल्या सारखा प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.