२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेनही या डेपोला विरोध दर्शवला होता

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2018 10:05 AM IST

२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार

मुंबई, २१ सप्टेंबर- राष्ट्रीय हरित लवादाने आरेमधील मेट्रो 3 च्या कारशेडला मंजुरी दिलीय.जुलै 2015 पासुन या प्रकरणावर लवादासमोर सुनावणी सुरु होती.मे मध्ये याबाबत  लवादाने कोणत्याही प्रकारच्या कामाला स्थगिती देत जैसे थे चा आदेश दिला होता. वनशक्ती ही एनजीओ सातत्यानं या डेपो बांधकामचा विरोध करत राष्ट्रीय हरित लवादापुढे गेली होती. स्थानिक लोकांनीही वनशक्ती एनजीओला पाठींबा दर्शवला होता. 2298 झाडांची कत्तल होणार असल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेनही या  डेपोला विरोध दर्शवला होता. पण आता  हरित लवादाच्या या निर्णयानंतर मेट्रो तीन चा डेपो हा आरेतच होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.

VIDEO : रडणं वाईट म्हणता... हे पाहा रडण्याचे फायदे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 10:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...