महाराष्ट्राने गमावला उत्तम कॅरमपटू, डंपरच्या धडकेत मुंबईच्या जान्हवी मोरेचा जागीच मृत्यू

महाराष्ट्राने गमावला उत्तम कॅरमपटू, डंपरच्या धडकेत मुंबईच्या जान्हवी मोरेचा जागीच मृत्यू

नेहमी हसतमुख आणि मृदुभाषी असलेल्या जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील अनेक कॅरमपटू आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

  • Share this:

प्रदीप भणगे, प्रतिनिधी

डोंबिवली, 13 मे : डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या कॅरमपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू जान्हवी मोरेचा अपघातात मृत्यू झाला आहे. पलावा सिटी सर्कल इथं डंपरने उडविल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर क्रीडा प्रेमींमध्ये या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.

रविवारी संध्याकाळी पलावा सिटी सर्कल इथं जान्हवी मोरेला डंपरनं उडवलं. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. जान्हवीच्या पश्चात आई-वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. आज सकाळी डोंबिवलीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

नेहमी हसतमुख आणि मृदुभाषी असलेल्या जान्हवीला अंतिम निरोप देण्यासाठी ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील अनेक कॅरम खेळाडू आणि कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. अशा पद्धतीने आपल्या मुलीला गमावल्याने मोरे कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही पाहा: मुंबईतील ATMमध्ये तरुणीसमोर युवकाचं हस्तमैथुन, मुलीनेच शूट केला VIDEO

जान्हवीने 2015 साली राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत जुनिअर राज्य विजेतेपद पटकावून खेळाची सुरुवात केली होती. सब-जुनिअर आणि जुनिअर राष्ट्रीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. अवघ्या 20 वर्षाच्या जान्हवीने नुकत्याच नागपूर इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांतील युवा गटात कांस्य पदक पटकावलं होतं.

अलिकडे ती सीनियर गटातही चांगली कामगिरी करत असल्याने भविष्यात महाराष्ट्राला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण तिच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राने एक उत्तम खेळाडू गमावला असंच म्हणावं लागेल.

निकालाआधी राज ठाकरेंचा मोदींवर घणाघात, पाहा UNCUT पत्रकार परिषद

First published: May 13, 2019, 6:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading