Home /News /mumbai /

नसीरुद्दीन शाहांच्या मुलीचा CCTV VIDEO आला समोर, महिला कर्मचाऱ्याच्या लगावली कानाखाली

नसीरुद्दीन शाहांच्या मुलीचा CCTV VIDEO आला समोर, महिला कर्मचाऱ्याच्या लगावली कानाखाली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची मुलगी हीबा शाह हिच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई, 25 जानेवारी : बॉलिवूडचे ज्येष्ठ  अभिनेता नसीरुद्दीन शाह  यांची मुलगी हीबा शाह हिच्या विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हीबा शाह यांच्यावर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला आहे. हीबा शाहवर वेटनरी क्लिनिकनं मारहाणीचा आरोप केला आहे. हीबानं 16 जानेवारीला या क्लिनिकच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा क्लिनिकच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांसोबत वादावादी झाली त्यानंतर हीबाने कर्मचाऱ्याला मारहाण केली. इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना आडवलं असता त्यानंतर हीबा तिथून निघून गेल्या. फेलाइन फाउंडेशननं दिलेल्या माहितीनुसार, हीबा 16 जानेवारीला तिच्या एका मैत्रिणीसोबत या क्लिनिकमध्ये दोन मांजरींची नसबंदी करण्यासाठी गेली होती. पण काही कारणानं हे ऑपरेशन होऊ शकलं नाही. त्यामुळे हीबानं तिथल्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालायला सुरुवात केली आणि त्यांना धमकी देऊ लागली. पण हे प्रकरण पुढे एवढं वाढलं की हीबानं क्लिनिकच्या 2 महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हीबाच्या विरोधात मुंबई पोलिसांनी भादंवि कलम 323, 504 आणि 506 खाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, हीबानं हे सर्व आरोप फेटाळले असून आपण कोणालाही मारहाण केली नाही तर या क्लिनिकचे कर्मचारी मला आत येऊ देत नव्हते तिथल्या महिला कर्मचाऱ्यांनी मला धक्काबुक्की केली असं तिचं म्हणणं आहे. याशिवाय अभिनेता नसीरुद्दीन शाह काही दिवसांपूर्वी CAA आणि NCRच्या मुद्द्यावर त्यांच्या अनुपम खेर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. ते म्हणाले होते, ‘मी ट्विटर वापरत नाही. अनुपम खेर सारखे बरेच माझ्याबाबत काही ना काही बोलत असतात. पण मी त्यांच्याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही. तो एक जोकर आहे. हे त्याच्या रक्तात आहे त्यामुळे आपण त्याची मदत करु शकत नाही.’
Published by:sachin Salve
First published:

Tags: Actress, Daughter, Naseeruddin Shah

पुढील बातम्या