'लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत'

'लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत'

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

  • Share this:

मुंबई, 12 मार्च: लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भाष्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. भाजप सरकार विरोधात येत्या 14 तारखेला केंद्रातील सर्व घटक पक्ष निवडणुकीच्या मुद्यावर चर्चा करणार असल्याचे पवारांनी सांगितले. बुधवारी होणाऱ्या या बैठकीला मी स्वत: जाणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईत एका कार्यक्रमात ते बोलत होते.

निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप असेल पण त्यांना स्वबळावर सत्ता मिळणार नाही. अशा परिस्थितीत पंतप्रधानपदासाठी त्यांना हवा तो उमेदवार देता येणार नाही. मी काही ज्योतिषी नाही पण या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे देखील पवार म्हणाले.

विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार - शरद पवार

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावरून टोला लगावला आहे. पवार म्हणाले, माझ्या घरातल्या मुलाचा हट्ट मी पुरवला. मात्र विखेंच्या मुलाचा हट्ट मी कसा पुरवणार? तो हट्ट पूर्ण करण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. पवारांच्या या टिप्पणीवरून त्यांनी नेमकं काय राजकारण झालंय यावरही भाष्य केलंय. तसेच सुजय विखे हे काही राज्य पातळीवरचं नेतृत्व नाही, त्यांचा हट्ट पुरवण्याची जबाबदारी ही त्यांच्या वडिलांची आहे. मी हट्ट पुरवला असता तर विखेंना काय वाटलं असतं. मुलाचा हट्ट इरांनी का पुरवावा.दरम्यान प्रकाश आंबेडकर आमच्या सोबत कधीच नव्हते. शेतकरी संघटने बरोबर चर्चा झाली आहे मार्ग निघेल असेही त्यांनी सांगितले.

नगरच्या जागेसाठी सुजय हे आग्रही होते. मात्र ती जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्याने ती त्यांनी काँग्रेससाठी सोडली नव्हती. पवार आणि विखे यांचं राजकारणात जुणं भांडण आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रयत्न करूनही राष्ट्रवादीने ती जागा सोडली नाही. पवारांनी नगरची जागा न सोडून एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातं. एक म्हणजे त्यांनी विखेंचा हिशेब चुकता केला तर विरोधीपक्ष नेत्याचाच मुलगा भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला धक्का बसला.

साहेबांचा निर्णय मान्य, पण...,रोहित पवारांचा पहिला VIDEO

First Published: Mar 12, 2019 08:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading