पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा कोनशिला समारोह संपन्न;2019ला पहिले उड्डाण

दरम्यान याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीमधल्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री गजपथी राजू उपस्थित होते.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2018 06:13 PM IST

पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा कोनशिला समारोह संपन्न;2019ला पहिले उड्डाण

18 फेब्रुवारी: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा कोनशिला समारोह संपन्न झाला आहे. पुढच्या वर्षी पासून नवी मुंबई विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होईल असं आश्वासन नरेंद्र मोदींनी दिलंय.

दरम्यान याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते जेएनपीटीमधल्या चौथ्या कंटेनर टर्मिनलचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री गजपथी राजू उपस्थित होते. नवी मुंबई विमानतळ जलमार्गानं जोडणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिली. तर या दोन्ही प्रकल्पामुळं स्थानिकांना मोठा रोजगार मिळणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.याठिकाणी नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. आपल्या भाषणात त्यांनी आधीच्या सरकारची नीती लटकाना पटकाना अटकाना अशी होती अशी टीका केलीय.तसंच  ही वाजपेयी सरकारची संकल्पना असल्याचंही त्यांनी सांगितलं .

आता या आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळाचं कामकाज कधी सुरू होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2018 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...