सत्तास्थापनेची कोंडी कायम असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी घेतला मोठा निर्णय

सत्तास्थापनेची कोंडी कायम असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी घेतला मोठा निर्णय

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने निर्णय निर्णय लवकरात लवकर घ्या अशी मागणी महाराष्ट्रातल्या सर्वच खासदारांनी केली होती.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्तास्थापनेची कोंडी कायम असताना केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेतलाय. क्यार वादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचे मोठं नुकसान झालेलं आहे. याची पाहणी करण्यासाठी पाच सदस्यीय केंद्रीय पथक उद्या महाराष्ट्रात दाखल होणार आहे. 22, 23 आणि 24 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये हे पथक राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि नाशिक या विभागांमध्ये हे पथक भेट देणार आहे. डॉ. व्ही. तिरुपुगल यांच्या नेतृत्वाखाली पथक महाराष्ट्रात येणार आहे. अवकाळी पावसाचा फटका राज्यातील 34 जिल्हे आणि 352 तालुक्यांना बसलेला असून 94 लाख हेक्‍टर शेतीचं नुकसान झालेलं आहे. तर याचा फटका राज्यातील एक कोटी तीन लाख शेतकऱ्यांना बसलेला आहे.

शरद पवार आणि PM मोदी यांच्या भेटीवर सोनिया गांधी नाराज!

राज्याच्या वतीने 7207.79 कोटी रुपयांची मदत केंद्र सरकारकडे मागितली आहे. कालच एक शासकीय निर्णयाद्वारे 2059 कोटी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वितरित करण्यात आलेले आहेत. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्‍टरी हेक्‍टरी 6800 रूपये, बागायती शेतीसाठी प्रति हेक्टरी 13500, फळबागांसाठी प्रति हेक्टर 18000 रुपये अशी मदत देण्यात येणार आहे.

या अवकाळी पावसाचा फटका सगळ्यात जास्त औरंगाबाद विभागाला बसलेला असून त्याखालोखाल अमरावती आणि नाशिक या दोन विभागात मोठं नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्वाधिक फटका सोयाबीन आणि त्यानंतर कापूस या पिकाला बसलेला आहे.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर संजय राऊत यांची पहिला प्रतिक्रिया

22 नोव्हेंबरला या पथकांसमोर औरंगाबाद, अमरावती आणि नाशिक इथं प्रेझेंटेशन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीचा दौरा होणार आहे.

हे अधिकारी करणार पाहणी

1) औरंगाबाद विभाग - डॉ. व्ही तिरुपुगल आणि डॉ. मनोहरन

2) अमरावती आणि नागपूर विभाग- डॉ. आर.पी. सिंग

3) नाशिक विभाग - दीनानाथ आणि डॉ. सुभाषचंद्रा

Tags:
First Published: Nov 20, 2019 04:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading