महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्राचा डाव, प्रकाश आंबेडकरांचा आरोप

ज्याप्रमाणे जम्मु काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवटीत जम्मु काश्मिरचे तीन तुकडे केले तसेच महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव

  • Share this:

मुंबई 21 नोव्हेंबर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय. राष्ट्रपती राजवट लागू करून केंद्र सरकार महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा डाव आहे असा गंभीर आरोप आंबेडकर यांनी ट्विट करून केलाय. आंबेडकरांच्या या आरोपांनी खळबळ उडाली आहे. ते ट्विटमध्ये म्हणाले, मुंबई केंद्रशासित प्रदेश, विदर्भ वेगळे राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचे एक राज्य असे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. यासाठी केंद्रातील सरकारला राज्यात राष्ट्रपती राजवट हवी आहे. ज्याप्रमाणे जम्मु काश्मिरमध्ये राष्ट्रपती राजवटीत जम्मु काश्मिरचे तीन तुकडे केले. त्याच प्रमाणे राज्याचेही तीन तुकडे करण्याचा डाव असा असा आरोप त्यांनी केला.

24 ऑक्टोबरला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्रच बदलून गेलं. भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळूणही ते वेगळे झाले. नंतर काही दिवस कुणीही सत्तास्थापनेचा दावा करू न शकल्याने राष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. अशी राजवट लागू करणं हाच केंद्राचा डाव असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केलाय.

महाराष्ट्राचं नवं राजकीय समीकरण : मोदींचं सर्वात मोठं स्वप्न धोक्यात?

सोमवारी होणार सत्ता स्थापनेचा दावा

गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेली सत्तास्थापनेची कोंडी फुटण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होणार असून त्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्विराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सर्वच मुद्यांवर एकमत झालं असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता सगळं लक्ष शिवसेनेवर केंद्रीत होणार आहे. पुढची रणनीती काय असावी यावरही शिवसेनेसोबत चर्चा होणार असून सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे.

High Alert सुरक्षा दलांवर 'ड्रोन'ने हल्ल्याचा माओवाद्यांचा प्लान

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची उद्या शुक्रवारी मुंबईत भेट होणार आहे. शिवसेना सोबत बैठक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्व नेते सोमवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर 27 नोव्हेंबर पर्यंत शपथविधी होईल अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 10:05 PM IST

ताज्या बातम्या