मुंबई, 10 एप्रिल: महाराष्ट्रात कोरोना लसीकरण (Covid vaccination) मोठ्या वेगाने सुरू आहे. मात्र, याच वेळी महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना लसीचा तुटवडा (Covid vaccine shortage) निर्माण झाल्याचं दिसत आहे. राज्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याचं समोर आलं. यामुळे राज्य सरकार (Maharashtra Government) आणि केंद्र सरकार (Central Government) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. इतर राज्यांच्या तुलनेत राज्याला लस कमी दिल्याचा दावा राज्य सरकारने केला तर केंद्राने महाराष्ट्राला सर्वाधिक लस दिल्याचं म्हटलं आहे. याच आरोप-प्रत्यारोप दरम्यान आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि एक पत्रक काढून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभेतील आकडेवारी आपल्या पत्रकार जाहीर केली आहे. ही आकडेवारी जाहीर करत पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोप केला आहे की, केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांना कशा प्रकारे वैद्यकीय उपकरणे अधिक दिली आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत म्हटलं, "महाराष्ट्राला फक्त लस देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यात सुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत."
महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत. pic.twitter.com/MdYDR4Ly3W
हे पण वाचा: Remdesivir बाबत मोठा निर्णय; जिल्हास्तरावर होणार नियंत्रण कक्षाची निर्मिती
पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढे म्हटलं, पंतप्रधान हे विसरताना दिसत आहेत की, ते केवळ गुजरात, उत्तरप्रदेश आणि इतर भाजपशासित राज्यांचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत.
पाहूयात ही आकडेवारी काय सांगते?गुजरात
N95 मास्क - 9623
PPE किट्स - 4951
Ventilators - 13
उत्तरप्रदेश
N95 मास्क - 3916
PPE किट्स - 2446
Ventilators - 7
पश्चिम बंगाल
N95 मास्क - 3214
PPE किट्स - 848
Ventilators - 2
तमिळनाडू
N95 मास्क - 2213
PPE किट्स - 639
Ventilators - 2
महाराष्ट्र
N95 मास्क - 1560
PPE किट्स - 723
Ventilators - 2
केरळ
N95 मास्क - 814
PPE किट्स - 192
Ventilators - 1
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.