Home /News /mumbai /

मागण्या मान्य होईपर्यंत GST भरु नका, पंतप्रधान मोदींचा भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला

मागण्या मान्य होईपर्यंत GST भरु नका, पंतप्रधान मोदींचा भाऊ प्रल्हाद मोदींचा व्यापाऱ्यांना सल्ला

PM Narendra Modi brother: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे लहान भाऊ प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

    मुंबई, 31 जुलै: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे लहान भाऊ (Brother) आणि अखिल भारतीय रास्तभाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी (Pralhad Modi) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीनं आयोजित व्यापाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाला प्रल्हाद मोदी यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. उल्हासनगरमध्ये कोरोना (Corona Virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांची प्रल्हाद मोदी यांनी भेट घेतली. या कार्यक्रमात व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या प्रल्हाद मोदी यांच्याकडे व्यक्त केल्या. या कार्यक्रमा दरम्यान प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. तसंच नरेंद्र मोदी असो की आणखी कुणी, त्यांना तुमचं ऐकावंच लागेल. आपण लोकशाही राहतो, गुलामगिरीत नाही, असंही ते म्हणालेत. इतकंच काय तर त्यांनी व्यापाऱ्यांना जीएसटी न भरण्याचा सल्ला दिला.मागण्या मान्य होईपर्यंत जीएसटी (GST) भरु नका असं प्रल्हाद मोदी यावेळी म्हणालेत. पुढे प्रल्हाद मोदींनी व्यापाऱ्यांना पाठिंबा देत मोदी सरकार आणि ठाकरे सरकारला एक प्रकारचं आवाहन दिलं आहे. ते म्हणाले की, मागण्या पूर्ण होईपर्यंत जीएसटी भरणार नाही, अशा प्रकारचं आंदोलन करा. व्यापाऱ्यांनीच असं केलं तर उद्धव ठाकरेच काय नरेंद्र मोदीही तुमच्या दारात येतील. मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा; पालिकेनं दिली ही महत्त्वाची सूचना आज मी तुम्हाला सांगतोय, आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहा. त्यांना सांगा, आमचं ऐकून घेईपर्यंत आम्ही जीएसटी भरणार नाही. नरेंद्र मोदी असो वा मग आणखी कुणी. आपण लोकशाहीत जगतोय, हुकुमशाहीत जगत नाही, असं प्रल्हाद मोदी व्यापाऱ्यांना म्हणालेत. मोदी चहावाले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणण्यापेक्षा चायवाले का बेटा असं म्हणा असं ते या कार्यक्रमात बोलले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं. त्यामुळे आम्ही सर्व चायवाले के बेटे आहोत, असं प्रल्हाद मोदी यांनी म्हटलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: GST, Modi government, Pm modi

    पुढील बातम्या