मुंबई, 23 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांच्याबद्दल अरेरावीची भाषा वापरणे भाजपचे (bjp) नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane arrested) यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर राणेंनी हायकोर्टात (high court) दार ठोठावले आहे. पण, तांत्रिक अडचणीमुळे नारायण राणे यांचा आजचा मुक्काम हा पोलीस स्टेशनमध्ये (police station) राहणार अशी दाट शक्यता आहे.
आज दुपारी पोलिसांनी नारायण राणे यांना गोळवली येथून अटक केली. पण, त्याआधीच राणेंनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता. पण, जामीन अर्ज फेटाळून लावल्यामुळे पोलिसांनी राणेंना अटकेची प्रक्रिया सुरू केली. पण, दुसरीकडे राणेंनी हायकोर्टाचे दार ठोठावले. दुपारी हायकोर्टाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी नारायण राणेंना अटक केली.
Gold Price Today: सोन्याचांदीच्या दरात तेजी, खरेदीआधी तपासा आजचा सोन्याचा भाव
पण, आता नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आज हायकोर्टात याचिका फाईल होणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे आज याचिका दाखल होऊ शकणार नाही. उद्या सकाळी याबद्दल याचिका दाखल होईल. कारण, गुन्हे दाखल केल्याचे ओरीजनल डॉक्युमेंट शिवाय न्यायालयाने याचिका दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे.
तसंच, फौजदारी गुन्हे असल्याने राणे यांना उद्या कोर्टात हजर व्हावं लागणार आहे. दुसरीकडे राणे यांनी आधीपासूनच अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे, त्यामुळे त्याची सुनावणी मुंबईत होईल. तर, आता अलिबागचे एसपी आणि IG महाडला आल्यावर एक बैठक होणार आहे.
उद्धव ठाकरेंनी केलं शिवसैनिकांचं कौतुक
नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही, पण आज शिवसैनिकांनी आपले नवे रुप दाखवत भाजपला गारद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उगारण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून ते राज्यभर जोरदार निदर्शनं केली.
अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर आक्रमकपणे हल्ला केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली. सकाळपासून सुरू झालेली आंदोलनं अजूनही राज्यात ठिकठिकाणी होत आहे. दुपारी आज नारायण राणे यांना अखेर अटक झाली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष करत फटाके फोडण्यास सुरूवात केली.
युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. आज युवासैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणखी जल्लोष वाढल्याचं पाहण्यास मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: High Court