मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Chipi Airport Inauguration: "कुठलंही राजकारण करणार नाही, उद्घाटनाला गालबोट लागेल असं काही होणार नाही"- नारायण राणे

Chipi Airport Inauguration: "कुठलंही राजकारण करणार नाही, उद्घाटनाला गालबोट लागेल असं काही होणार नाही"- नारायण राणे

Chipi Airport Inauguration: "कुठलंही राजकारण करणार नाही, उद्घाटनाला गालबोट लागेल असं काही होणार नाही"- नारायण राणे

Chipi Airport Inauguration: "कुठलंही राजकारण करणार नाही, उद्घाटनाला गालबोट लागेल असं काही होणार नाही"- नारायण राणे

Chipi Airport Inauguration: चिपी विमातळाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर उपस्थित.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 9 ऑक्टोबर : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे (Sindhudurg Chipi Airport) लोकार्पण आज होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) हस्ते हे लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे एकाच व्यासपीठावर शेजारी-शेजारी बसणार आहेत. काल नारायण राणेंनी आक्रमक होत शिवसेनेवर निशाणा साधला होता. तसेच विमानतळ उद्घाटन कार्यक्रमात हप्तेखोरांची नावे जाहीर करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज नारायण राणे यांनी नरमाईची भूमिका घेतली असल्याचं दिसत आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला जाण्यापूर्वी नारायण राणेंनी म्हटलं, एका स्टेजवर आलो म्हणजे काय? राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून आम्ही स्वागत करु त्यांचं. कुठलंही राजकारण करणार नाही, उद्घाटनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आमच्याकडून होणार नाही. शेजारी शेजारी खुर्ची असणं चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बऱ्याच दिवसांनी हा क्षण आला आहे. मुख्यमंत्री अन् नारायण राणेंची खुर्ची शेजारी-शेजारी दुपारी 1 वाजता या विमानतळाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. यावेळी एकाच व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखिल उपस्थित राहणार आहेत. इतकेच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची खुर्ची एकमेकांच्या आजुबाजुला असणार आहे. दोन्ही नेते एकमेकांसोबत संवाद साधणार का? हे पहावं लागेल. त्यामुळे राजकीय वर्तुळात या उद्धघाटन सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. कोकणात हप्तेबाजी सुरू, हप्ते घेणाऱ्यांच्या नावाचा भांडाफोड करणार : नारायण राणे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी शिवसेनेवर निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, चिपी विमानतळावरुन पहिलं विमान जेव्हा उड्डाण करेल तेव्हा मला वेगळाच आनंद होईल. माझ्या आयुष्यातील स्वप्न होतं की या सिंधुदुर्गातून विमानाने टेक ऑफ घ्यावा ते पूर्ण होत आहे. सिंधुदुर्गातील लोक साक्षीदार आहेत. यांनी काय केलं? आम्हीच सर्व केलं. परवानगी सुद्धा मी आणली. यांना कोण विचरतंय दिल्लीत? कायद्याने कामे करावी लागतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा, लोकप्रतिनिधींचा सिंधुदुर्गातील कंत्राटदारांना फार त्रास आहे. चौपदरीकरणाचं काम सुरू झालं तेव्हाही गाडी घेतल्याशिवाय काम करू दिलं नाही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी. चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजपची पोस्टरबाजी कोकणात पुन्हा एकदा चिपी विमातळाच्या निमित्ताने राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष उभा राहत असल्याचं चित्र आहे. भाजप नेत्यांच्या पोस्टरबाजीनं याला सुरुवात झाली आहे. चिपी विमानतळाचं उद्घाटनपूर्वीच श्रेयवादानं जोर धरला आहे. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी जोरदार होर्डिंगबाजी करत चिपी विमानतळ हे नारायण राणेंच्या प्रत्यत्नातूनच साकार होत असल्याचा टोला शिवसेनेला लगावला आहे. चिपी विमानतळाचं श्रेय शिवसेना घेण्याचा प्रयत्न करत असेल, तरी प्रत्यक्षात राणेंनी केलेले प्रयत्न आणि त्याला आलेली फळं हे वास्तव कोकणातील जनतेला चांगलंच ठाऊक असल्याचा दावा भाजपनं केला आहे. शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात कोकणात शक्तीप्रदर्शन केवळ राणेच करू शकतात, इतर कुणाचाही तो घास नाही, असं म्हणत भाजपनं शिवसेनेला जोरदार टोला लगावला आहे. वाघाच्या गुहेत येऊन कुणीही शक्तीप्रदर्शन करू नये, असं सांगत त्यांनी कोकणात नारायण राणेंची कुणाशीही तुलना होऊ शकत नसल्याचं विशाल परब यांनी म्हटलं आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा भाजपनं शिवसेनेला छेडण्याचा प्रयत्न केला आहे. चीपी विमानतळाचे वेळापत्रक मुंबई ते सिधुदूर्ग आणि सिधुदूर्ग ते मुंबई असा हवाई प्रवास 9 आँक्टोंबरपासून सुरू होतोय. त्यासाठी दररोज होणार्या नव्या चीपी विमानतळावर विमानांचे उड्डाण वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 1) जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार भूजहून येणारे '9आय661' क्रमांकचे विमान मुंबईहून सकाळी 11 वाजून 35 मिनिटांनी सिंधुदुर्गसाठी टेक ऑफ घेईल. हे विमान विमानतळावर दुपारी 1 वाजता पोहोचेल. 2) विमानाचा '9आय661' सिंधुदुर्गातून परतीचा प्रवास दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी सुरू होईल. हे विमान मुंबईत 2 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. 3) सिंधुदुर्गातून शहरात जाण्यासाठी 'अलायन्स एअर' चे 70 आसनी एटीआर 72-600 विमान तैनात राहणार आहे. 4) उद्घाटनाच्या दिवशी मुंबई-सिंधुदुर्ग विमान प्रवासाचे भाडे 2,520 आहे तर सिंधुदुर्ग मुंबई प्रवासासाठी 2,621 रुपये असेल.
First published:

Tags: Narayan rane, Sindhudurg, Uddhav thackeray

पुढील बातम्या