राणेंची उद्या पत्रकार परिषद, 'महत्वा'ची घोषणा करणार ?

राणेंची उद्या पत्रकार परिषद, 'महत्वा'ची घोषणा करणार ?

काँग्रेसचे नेते नारायण राणे उद्या (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे

  • Share this:

24 एप्रिल : काँग्रेसचे नेते नारायण राणे उद्या (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे. राणेंच्या या घोषणेमुळं राज्याच्या राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचा अंदाज राजकीय निरिक्षकांनी व्यक्त केलाय.

26 एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या राज्य कार्यकारणीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषद घेणार असल्यानं राणे काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्षं लागलंय..

उपाध्यक्ष राहुल गांधींना भेटून आल्यानंतरही राणेंची नाराजी दूर गेली नाही उलट मतभेद टोकाचे झाले. त्यातच भर म्हणजे राणे आणि मुख्यमंत्री अहमदाबादमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना भेटूनही आलेत. राणेंनी मात्र अशी भेट झाल्याचं नाकारलं होतं.

आपण योग्य वेळी निर्णय घेऊन हा निर्णय महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हिताचा असेल कार्यकर्त्यांनी आपल्याला साथ द्यावी असं भावनिक आवाहनही राणेंनी काल केलं होतं.

त्यामुळे उद्या ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 24, 2017 05:54 PM IST

ताज्या बातम्या