S M L

अहमदाबाद गुप्त भेटीवर राणे काय बोलणार ?

"अहमदाबादमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा राणे करणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत राणे काय बोलणार... "

Sachin Salve | Updated On: Apr 13, 2017 02:44 PM IST

अहमदाबाद गुप्त भेटीवर राणे काय बोलणार ?

13 एप्रिल : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी दाट शक्यता निर्माण झालीये. दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे आपली भूमिका मांडणार आहे.

'भूकंप कधीही सांगून येत नाही' असं सूचक वक्तव्य करून नारायण राणे यांनी भाजपचे दार ठोठावले. पक्षातंर्गत सुरू असलेल्या वादाला कंटाळून राणे यांनी दिल्लीवारी करून आपली नाराजी हायकमांडकडे बोलून दाखवली. त्यानंतर राणेंनी आपण पक्षात समाधानी असल्याचं सांगत प्रकरणावर पडदा टाकला.

पण काल बुधवारी थेट महाराष्ट्राची सीमा ओलांडून राज्याच्या नव्या राजकारणाची समीकरण जुळवली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. विशेष म्हणजे दस्तरखुद्द राणे तिथेच होते. एकाच कारमधून राणे आणि मुख्यमंत्री शहांनी भेटाला गेले.या सर्व घडामोडीनंतर अखेर आता राणे आज बोलणार आहे. अहमदाबादमध्ये नेमकं काय घडलं याचा खुलासा राणे करणार आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत राणे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 01:18 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close