S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

संघर्षयात्रा फसली, राणेंचा स्वकियांवरच पुन्हा प्रहार

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी 'विरोधकांची संघर्ष यात्रा फसली' अशी स्वकियांवरच टीका करून घरचा अहेर दिलाय

Sachin Salve | Updated On: May 8, 2017 07:09 PM IST

संघर्षयात्रा फसली, राणेंचा स्वकियांवरच पुन्हा प्रहार

08 मे : भाजपच्या वाटेवर असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी 'विरोधकांची संघर्ष यात्रा फसली' अशी स्वकियांवरच टीका करून घरचा अहेर दिलाय. तसंच भाजपची आपल्याला आॅफर आहे पण काँग्रेस सोडण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही असंही राणे म्हणाले.

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आपली IBN लोकमतशी बोलताना पुन्हा एकदा भाजप प्रवेशाचा मुद्दा खोडून काढला.  भाजपात जाणार या चर्चा मीडियाने पसरवल्या. मी भाजपमध्ये जाणार असं  कधीच बोललो नाही. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अहमद पटेल यांच्याशी सव्वा तास भेट झाली. राज्यात काँग्रेस कशाप्रकारे निष्क्रीय आहे. हे मी त्यांना सांगितलं अशी माहितीही राणेंनी दिली.

तसंच अर्थसंकल्पयीय अधिवेशनानंतर संघर्ष यात्रा काढली असती तर प्रतिसाद मिळाला असतात. पण आता ही संघर्ष यात्रा सपेशल फेल गेली आहे. कोकणातल्या संघर्ष यात्रेची जबाबदारी दिली असली हे त्यांनी जाहीर केलंय. पण मला कोणी फोन करून विचारलं नाही अशी टीकाही राणे यांनी स्वकियांवरच केलीये.मी भाजपमध्ये गेलो तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल म्हणते. त्यांनी बाहेर पडून दाखवावं. त्यांचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत असं आव्हानच राणे यांनी सेनेला दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 07:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close