राज्य मंत्रिमंडळ विस्तार निश्चित; राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

राज्य मंत्रिमंडळ विस्तार निश्चित; राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जातं असले तरी राणेंना कुठलं खातं दिलं जाईल याबाबत मात्र संदिग्धता बाळगण्यात येते आहे

  • Share this:

 मुंबई, 03 ऑक्टोबर:  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळात नारायण राणे यांना ही स्थान मिळू शकते अशी चर्चा आहे.

10 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाचा  विस्तार होऊ शकतो.विस्तारामध्ये  काही मंत्र्यांचा भार कमी करण्यात येणार आहे. नारायण राणेंना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जातं असले तरी  राणेंना कुठलं खातं दिलं जाईल याबाबत मात्र संदिग्धता बाळगण्यात येते आहे. अमित शहा यांच्या 9 तारखेच्या बैठकीत मंत्रिमंडळावर  अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.

दरम्यान  राज्यात सध्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी चालू आहेत. या सगळ्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची एक बैठक घेण्यात येणार आहे. नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होणार आहे. लोकलला झालेला अपघात, मुख्यमंत्री यांचा परदेश दौरा आणि शिवसेना भाजप मध्ये रंगलेला वाद या पार्श्वभूमीवर मंत्री मंडळाची आज बैठक होते आहे. या सर्व राजकीय संदर्भाचे पडसाद मंत्री मंडळात उमटण्याची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा आणि खान्देशात पडलेला अत्यल्प पाऊस , याबाबत चर्चा मंत्रिमंडळात होईल अशी शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2017 11:23 AM IST

ताज्या बातम्या